आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात वंशवादाविरोधात आंदोलन सुरू आहे. अमेरिकेत आंदोलकांनी क्रिस्टोफर कोलंबस यांचा पुतळा तोडून नदीत टाकला. इंग्लंडमध्ये आंदोलकांनी ६० पुतळ्यांची यादी तयार केली आहे, ज्यांना तोडायचे आहे. तसेच बेल्झियम आणि कांगोतही पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. त्या आधी इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिलच्या पुतळ्याला लक्ष्य केले. आंदोलकांनी दावा केला की, ते केवळ गुलामगिरी, वंशवादाला चालना देणाऱ्यांचे पुतळे तोडत आहेत. मात्र, या संतापात काही इतरांचे पुतळेही सापडले. दरम्यान, ह्यूस्टनमध्ये फ्लॉयडवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर लुसियानातील श्रीवेपोर्ट शहरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसते की, ४ पोलिस अधिकारी एका कृष्णवर्णीय व्यक्तीला मारहाण करत आहेत. त्याला जमिनीवर आपटत आहेत. व्यक्तीचे हात मागे बांधले आहेत. नंतर त्या व्यक्तीचा एका रुग्णालयात पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडिओ ५ एप्रिलचा आहे. कृष्णवर्णीय व्यक्तीचे नाव टॉमी डाले मॅकग्लोथन आहे. व्हिडिओ साडेचार मिनिटांचा आहे. पोलिसांनी याबाबत म्हटले आहे की, पोलिसांनी मॅकग्लोथनला शांत करण्यासाठी बळाचा वापर केला. तो आंदोलन करत होता, हिंसक होता. त्याने त्याच्या घरमालकाशी भांडण केले होते.
रिचमंड : आंदोलक म्हणाले- काेलंबस नरसंहाराचे प्रतीक
छायाचित्र अमेरिकेतील रिचमंड शहराचे आहे. येथील बायर्ड पार्कमध्ये आंदोलकांनी दोन तासांत कोलंबसचा पुतळा पाडला. नंतर पुतळ्याच्या जागवेर लिहिले की, कोलंबस नरसंहाराचे प्रतीक आहे. नंतर पुतळ्याला आग लावून (इनसेटचे छायाचित्र) नदीत फेकला. रिचमंडमध्ये डिसेंबर १९२७ मध्ये हा पुतळा लावण्यात आला होता. इतिहासकारांच्या मतानुसार कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. वंशवाद विरोधी सांगतात की, कोलंबसने अमेरिकी वंशाच्या लोकांच्या नरसंहारास चालना दिली. अमेरिकेतलील १० राज्यांत कोलंबस विरोधात ‘इंडिजीनस पीपल्स डे’ साजरा होतो.
लंडन : रॉबर्ट मिलिगनचा ८ वा पुतळा पाडला
इंग्लंडच्या लंडनमध्ये आंदोलकांनी १८ व्या शतकातील व्यापारी रॉबर्ट मिलिगनचा ८ वा पुतळाही तोडला. आंदोलकांच्या मते मिलिगन गुलामांची खरेदी-विक्री करणारा व्यापारी होता. या आधी त्यांनी ब्रिस्टलमध्ये १७ व्या शतकातील व्यापारी अॅडवर्ड कोलस्टॉनचा पुतळा तोडला. कोलस्टॉनही गुलामांची सौदेबाजी करणारा व्यापारी असल्याचे आंदोलक मानतात. दरम्यान, बेल्झियमच्या ब्रसेल्समध्ये आंदोलकांनी राजा लिओपोल्ड दुसरा याच्या पुतळ्याची विटंबना केली. लिओपोल्डने बेल्झियममध्ये गुलामगिरीला चालना दिली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.