आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील नागरिकांमध्ये वैफल्य भावना वाढू लागले आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य समितीने पहिल्यांदाज एक शिफारस केली आहे. ६५ वर्षांहून कमी वयाच्या गटातील लोकांच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली जावी, असे सुचवण्यात आले आहे. त्यातही चिडचिडेपणा किती प्रमाणात आहे, हेदेखील जाणून घेतले जावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. अमेरिकेत लाँग कोविड, महागाईमुळे आर्थिक अडचणीतून जात आहे. त्यातून ते अनिश्चितता अनभवू लागले आहेत. यूएस प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्स अॅडव्हायजरी ग्रुपच्या मते, अशा तपासणीमुळे नागरिकांना मानसिक तणावाची तीव्रता कमी जाणवेल.
वास्तविक या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुले व किशोरवयीन मुलांसाठी वर्षाच्या सुरुवातीला देखील अशा प्रकारच्या तपासणीची शिफारस केली होती. ह्युमन हेल्थ व सर्व्हिस विभागाने कोविडपूर्वी हा अहवाल तयार केला आहे. मॅसाच्युसेट्स चान मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर व या टास्क फोर्सचा भाग राहिलेले लॉरी पबर्ट म्हणाले, ‘एंक्झायटीमुळे गुन्ह्यांत वाढ झाली, लॉकडाऊनचा तणाव, कोविडमध्ये नातेवाइकांचे निधन ही मोठी कारणे ठरली. टास्क फोर्सने अध्ययनात काही गोष्टींची नोंद केली. ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान वयस्करांत चिडचिडेपणा किंवा वैफल्याची लक्षणे दिसून आली. परंतु आता त्याचे प्रमाण ३६.४ टक्क्यांहून ४१.५ टक्के झाले आहे. मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार लोकांना या समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला तरच अशा तपासण्यांना काही अर्थ असेल. व्यापक पातळीवर आरोग्याच्या सुविधा आणि कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव करणे हे आरोग्य यंत्रणेपुढील दुसरे मोठे आव्हान आहे. २५ टक्के पुरुष, ४० टक्के महिला एंक्झायटीने पीडित आहेत. समितीच्या शिफारशींवर नागरिकांकडून १७ ऑक्टोबरपर्यंत मत मागवले जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.