आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In America, Whether It's Children Or Housework, The Mother Is Better At Managing, Responsibilities Between Husbands And Wives

गुड रीड:अमेरिकेमध्‍ये मुले असो वा घरातले काम, आईचे व्यवस्थापनच उत्तम, जबाबदारीवरून दांपत्यांमध्ये वाद

जेसिका ग्रोस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात राहणाऱ्या सोन्या बोंेजेक यांच्या ४ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस याच महिन्यात येत आहे. त्याच्या वर्गातील सर्व मुले बर्थडे पार्टीत सहभागी व्हावीत, असे त्यांना वाटते. मात्र, आपण असे करू शकणार नाही, याची त्यांना जाणीव झाली. कारण मुलांच्या आई-वडिलांचे ई-मेल आयडी व मोबाइल नंबर त्यांच्याकडे नाही. कारण ज्या प्री-स्कूलमध्ये त्यांचा मुलगा शिकतो तिथे ही सर्व माहिती शेअर करण्याची परवानगी नाही. मात्र, पुढच्याच दिवशी मुलास बस स्टॉपला सोडवायला गेल्या तेव्हा त्यांना एका मुलाचे वडील भेटले. सोन्या यांनी त्यांना संपर्काबाबतची माहिती मागितली असता ते म्हणाले, मी माझ्या पत्नीचा नंबर व मेल अ‍ॅड्रेस देतो. चॅपल हिलमध्ये राहणाऱ्या सोन्यांना याच्या पुढच्याच दिवशी एक व्यक्ती भेटली. ते आपल्या मुलीला सोडवण्यास आले होते.

सोन्या यांनी ई-मेल अ‍ॅड्रेस मागितला असता त्यांनीही पत्नीचा अ‍ॅड्रेस दिला. असे २-३ वेळा झाले तेव्हा नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये काम करणाऱ्या सोन्यांना वाटले की, हा केवळ योगायोग नाही. त्यांनी हा मुद्दा ‘सोशल एक्सपेरिमेंट’ शीर्षकासह सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी लिहिले, ‘मुलाच्या बर्थडे पार्टीत त्याच्या वर्गमित्रांना बोलावण्यासाठी त्यांच्या वडिलांना संपर्काचा तपशील मागितला तेव्हा त्यांनी स्वत:ऐवजी पत्नींचा तपशील दिला... हा नवा सोशल एक्सपेरिमेंट आहे. त्यांचा हा संदेश व्हायरल झाला व वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. काही वडिलांनी लिहिले, आमच्या पत्नी घरचे काम व मुलांचे अ‍ॅक्टिव्हिटी शेड्यूल करण्यात आमच्यापेक्षा अनेक पटीने कुशल आहेत. काही म्हणाले, आम्ही प्रयत्न करत नाही. अशा जबाबदाऱ्या फक्त महिलांच्या आहेत, असे मानतो. काहींनी सांगितले, एखाद्या अनोळखी महिलेशी माहिती शेअर करणे योग्य ठरणार नाही. बहुतांश यूजर्सने एक अमेरिकन शो गर्ल्स ५एवाचे उदाहरण देत हा बदल समजावून सांगितला.

या शोच्या क्रिएटर मेरेडिथ स्कार्डिनो सांगतात,‘ ऑक्टोबर-२०२० मध्ये माझ्या मुलाने प्री-स्कूल जॉइन केले होते. त्या वेळी शोच्या निर्मितीचे कामही सुरू होते. मुलास सकाळी सोडण्यासाठी माझे पती अँड्रयू जात होते. काही दिवसांनंतर तुमचा मुलगा जिम क्लासमध्ये पडल्याचे किंवा उशिरा पोहोचल्याचे शाळेतून फोन यायला लागले. आफ्टर स्कूल अॅक्टिव्हिटीजमध्येही ही स्थिती होती.

मुलांशी संबंधित उपक्रमांत आईचे योगदानच जास्त असते, असे प्यू रिसर्चच्या एका सर्व्हेतूनही समोर आले. तथापि, वडिलांचे म्हणणे होते की, आम्ही सारखीच जबाबदारी स्वीकारतो. आम्ही प्रत्येक उपक्रमात जास्त भूमिका निभावतो, असा दावा या सर्वेंक्षणात ६४% आईंनी केला होता. आई आमच्या तुलनेत जास्त जबाबदाऱ्या उचलते, असे ५३% पुरुषांनी मानले होते. प्यू रिसर्चच्या मते, आधुनिक वडील आपली तुलना मागच्या पीढीतील वडिलांशी करत आहेत. ६० च्या दशकाचे विश्लेषण केल्यास आजचे वडिल घरातील कामे दुपटीने जास्त करतात.

बातम्या आणखी आहेत...