आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालांबत जाणाऱ्या बैठकांमुळे एवढा वेळ जातो की, काम करायला वेळच शिल्लक राहत नाही. तुमची अशी भावना असेल तर तसे तुम्ही एकटेच नाहीत. जगभरात आॅफिस मीटिंग्ज १५३% पर्यंत वाढल्या आहेत. खूप साऱ्या कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना आता याचा वैताग येत आहे. अमेरिकी उद्योग जगत मीटिंग क्रिपपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असून उत्पादकता वाढवण्यासाठी नव्या पद्धती शोधत आहे. कंपनी संस्कृतीची माहिती ठेवणारी वेबसाइट जिप्पाच्या सर्वेक्षणात हा मुद्दा समोर आला आहे. सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत लोक दरमहा सरासरी ३१ तास अशा बैठकात सहभागी हाेतात ज्या त्यांच्या दृष्टीने अनुत्पादक आहेत. मिस बेंडर ६५ कर्मचाऱ्यांची कंपनी चालवतात. त्यांनी बैठका टाळण्याची पद्धती शोधली आहे. त्यांनी कंपनीत नोकरी भरती काढली आणि उमेदवाराला खुर्चीही दिली नाही. उभे राहून चर्चा केल्याने बैठक संपुष्टात आणून वेळ वाचवला. यामुळे काम, नोकरीच्या अपेक्षांवर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. बेंडर यांच्यानुसार, तसे केल्याने आपल्याला जे हवे ते २० मिनिटांत मिळाले. संपूर्ण चर्चेत आम्ही जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. अशा पद्धतीने नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीत मॅनेजमेंटचे प्रा. स्टीव्हन रोगेलबर्ग यांच्या म्हणण्यानुसार, बैठकीचा मुख्य उद्देश कंटाळवाणे करणे नव्हते. याचा मूळ उद्देश आपल्या निर्णयात जास्तीत जास्त लाेकांचा समावेश करून कर्मचाऱ्यांशी आपलेपणा निर्माण व्हावा हा होता.
बैठकीची वेळ कमी केल्याने कर्मचाऱ्यांचे वर्तन बदलले एका अन्य अभ्यासानुसार, कंपन्यांनी दर आठवड्यास एक बैठक न घेण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि कामाच्या समाधानात सुधारणा झाली. ७७% चे म्हणणे होते की, बैठक न झाल्याने त्यांना कामावर भर देणे सोपे झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.