आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशची राजधानी ढाका येथील एका सात मजली इमारतीत मंगळवारी दुपारी भीषण स्फोट झाला. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या तळघरात अनेक लोक अडकले असून त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या अपघातस्थळी बराच वेळ झटत होत्या. रॅपिड अॅक्शन बटालियनचे बॉम्ब डिस्पोजल युनिटही पोहोचले. या इमारतीत सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.