आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:ब्राझीलमध्ये एकाच दिवसात ६०० जणांचा झाला मृत्यू, एकूण बाधितांची संख्या १ लाख १४ हजार ७००

ऑयर्स3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • देशात एकाच दिवशी सर्वाधिक ६०० बाधितांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ

लॅटिन अमेरिकी देश ब्राझीलमध्ये जागतिक महामारी कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ६०० जणांचा मृत्यू झाल्याने ही संख्या ७ हजार ९२१ झाली आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

देशात एकाच दिवशी सर्वाधिक ६०० बाधितांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहा दिवसांपूर्वी ४७४ जणांचा मृत्यू झाला होता. देशात एकूण बाधितांची संख्या १ लाख १४ हजार ७०० एवढी झाली आहे.

मंगळवारी ताजी आकडेवारी जाहीर झाली. ब्राझीलमध्ये कोरोना झालेल्या ४८ हजार २०० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या जॉन हापकिन्स विद्यापीठातील विज्ञान व अभियांत्रिकी केंद्राद्वारे (सीएसएसई) जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाखांहून जास्त असल्याची नोंद करण्यात आली आहे. २.५७ लाखांहून जास्त लोकांना बाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी असल्याचे जाहीर केले होते.

बातम्या आणखी आहेत...