आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ब्रिटनमध्ये 20 टक्के लोकांनी मांसाहार सोडला, स्वादापेक्षा आरोग्याला अधिक महत्त्व

लंडन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाेक आता स्वादिष्ट पदार्थाएेवजी आराेग्यदायी पदार्थाला अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत. ब्रिटनमध्ये दशकभरात सुमारे २० टक्के लाेकांनी नाॅनव्हेज थाळीला दूर केले आहे. कर्कराेग, मधुमेह टाईप-२, हृदयाशी संबंधित वाढते राेग हे त्यामागील मूळ कारण ठरले आहे.

आॅक्सफर्ड विद्यापीठातील एका संशाेधनानुसार लाेकांनी चांगल्या आराेग्यासाठी मांसाहार खाणे कमी केले आहे किंवा ते नगण्य ठेवले आहे. रेड मीटच्या विक्रीत खूप घट झाली आहे. परंतु चिकन, मासे खाण्याकडे लाेकांचा कल वाढू लागला आहे. सामान्यांच्या खानपानातील या बदलामुळे पर्यावरणातील कार्बन उत्सर्जनाच्या समस्येतही घट हाेऊ शकेल. कारण रेड मीटसाठी जनावरांच्या पालन-पाेषणासाठी माेठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन हाेते.

खानपानातील या बदलामुळे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेनेदेखील अप्रत्यक्षपणे फायदा हाेणार आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठातील संशाेधनानुसार २००८-०९ दरम्यान ब्रिटनमध्ये प्रति व्यक्ती दरदिवशी १०३ ग्रॅम रेडमीट वापरत हाेता. २०१८-१९ मध्ये हे प्रमाण दरदिवशी २३ ग्रॅम प्रति व्यक्ती असे नाेंदण्यात आले. पाोल्ट्री अंतर्गत ३.२ टक्के अशी विक्री वाढ झाली. आॅक्सफर्ड विद्यापीठाने या प्रयाेगातून खानपानातील बदल बारकाईने नाेंदवला आहे. परंतु आराेग्यदायी जीवनशैलीसाठी लाेकांना आणखी व्यापक प्रयत्नांची गरज भासणार आहे, असा सल्ला संशाेधकांनी दिला आहे. लेन्सेट प्लेटनरी हेल्थमध्ये प्रकाशित लेखात गेल्या एक दशकादरम्यान उच्च उत्पन्न असलेल्या वर्गातील प्रगत देशांत मांसाहार खाण्यासंबंधीची रुची कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु उर्वरित जगभर मांसाहार खाण्याचे प्रमाण वाढले आहे.

शाकाहारींचे प्रमाण २ वरून ५ टक्के
आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या संशाेधनानुसार गेल्या एका दशकात ब्रिटनमध्ये शाकाहारी वर्ग २ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर गेला आहे. नॅशनल फूड स्ट्रॅटेजीनुसार २०३० पर्यंत ब्रिटनमध्ये रेडमीटची विक्री ३० टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. १९९९ नंतर जन्मलेल्या लाेकांत मांसाहार करण्याचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. फास्ट फूडमध्ये मांसाहारी पदार्थांचा वापर असा दावा केला जाताे.

बातम्या आणखी आहेत...