आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:ब्रिटनमध्ये 50  पार निवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर परत आणण्यासाठी कौशल्य कॅम्प लावले जाणार

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये लोक नोकऱ्या सोडत आहेत. कामगारांचा मोठ्या प्रमाणातील तुटवडा जाणवत आहे. अशा सरकार पन्नाशी ओलांडलेल्या ज्येष्ठांना कामावर परत आणण्यासाठी कौशल्य कॅम्पचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. सरकार या आठवड्यात अर्थसंकल्प जारी करणार आहे. यामध्ये निवृत्त लोकांना कामावर परत आणण्यासाठी नवे उपाय जाहीर केले जाऊ शकतात. यात एका स्थानिक कंपन्यांसोबत भागीदारीत बूटकॅम्प लावण्याचा समावेश आहे. यामध्ये ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कोर्सच्या माध्यमातून निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकवले जाईल.

वित्तमंत्री जेरेमी हंट यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना प्रामुख्याने बांधकाम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन कौशल्य शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या क्षेत्रांत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आधीपासूनच कमतरता आहे. रोजगार दर विक्रमी पातळीवर घसरला आहे. तरीही ८० लाख लोक नागरिक रोजगारापासून बाहेर आहेत. १० लाख नोकऱ्या रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी कुणी सापडत नाही. हंट यांच्या म्हणण्यानुसार, हे लाखो लोकांसाठी आपला जीवन स्तर सुधारणे व व्यवसाय जगतासाठी कौशल्याची कमतरता दूर करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. लेबर मार्कट रिसर्चवर काम करणारी संस्था रिझॉल्यूशन फाउंडेशननुसार, २०१९ ते २०२२ पर्यंत ८.३० लाख लोक आर्थिकदृष्ट्या निष्क्रिय झाले आहेत.

कर्मचारी न मिळाल्याने अनेक व्यवसायावर परिणाम कर्मचारी न मिळाल्याने अनेक क्षेत्रावर खूप वाईट परिणाम झाला आहे. विशेषत: फूड इंडस्ट्री आणि रेस्तराँ. कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी तुरुंगातील कैद्यांना भरती करावे लागत आहे. कैदी महिलांचीही जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...