आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In Britain, The Modern Lifestyle, Technology Is Causing The Concentration Of Young People To Lose Their Will Power

जीवनशैली बदलतेय:ब्रिटनमध्ये आधुनिक जीवनशैली, तंत्रज्ञानामुळे तरुणांची एकाग्रता ढळतेय, इच्छाशक्तीही कमी

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये तरूण वर्गाची एकाग्रता कमी होत आहे. आता हा वर्ग एखाद्या गोष्टीवर फार काळ लक्ष केंद्रीत करू शकत नाही. त्यांचे मन भटकू लागले आहे. त्यास आधुनिक जीवनशैली व तंत्रज्ञानाचा अति वापर या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे मेंदूचा जास्त वापर करावा लागत नाही. त्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होत असल्याचे दिसून आले.

मेंदूला खूप गोष्टींचे स्मरण करण्याची गरज भासत नाही. सेंटर फॉर अटेंशन स्टडीजच्या अहवालानुसार बहुतांश तरूण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. मेंदूला सक्रिय ठेवण्याची त्यांची क्षमता कमी होत चालली आहे. ३६ वर्षांत प्रत्येकाचा मेंदू ब्राउझरसारखा काम करू लागला आहे.

त्यात बऱ्याच विंडो सुरू असतात. त्याचा वाईट परिणाम त्यांच्या कामगिरी व गुणवत्तेवरही होत आहे. या प्रकल्पात गेल्या वर्षी काही तथ्ये समोर आली. पाहणीत सहभागी २ हजार वयस्करांपैकी ४९ टक्के लोकांनी आपली एकाग्रता कमी झाल्याचे अनुभवले. परंतु पैकी ४७ टक्के लोकांनी त्याबद्दल कबुली दिली. ही बाब भूतकाळातील आहे. आपल्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा किंवा सखोल चिंतनाचा असा सुसंगत उपाय नाही. यामधील त्रुटी सोडल्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे. ती म्हणजे आपण अकारण स्क्रोलिंग करत आहोत. ही आपली सवय झाली आहे.

दर तीन मिनिटांनी मन भटकते पाहणीनुसार दर मिनिटाला तरुणांचे मन भटकते. सरासरी एक व्यक्ती दिवसभरात ८५ हून जास्तवेळा फोन चेक करते. म्हणजे दर पंधरा मिनिटाला एकवेळा. अनेक तंत्र वापरूनही हा वर्ग या सवयीतून बाहेर येऊ शकलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...