आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेपर्यंत चीन हे कोविड-१९ चे जगातील शेवटचे ठिकाण होते. पण, काही आठवड्यांतच तेथे विषाणूची भयानक लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या आठवड्यात बीजिंगने कोविडसह जगण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. अलोकप्रिय आणि हानिकारक शून्य-कोविड धोरणांतर्गत लॉकडाऊन आणि क्वारंटाइन सोडले गेले आहे. विरोधादरम्यान हे अचानक पाऊल उचलल्याने आरोग्य सेवेवर मोठा भार पडण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या सुट्यांत ये-जा वाढल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते.
चीनच्या कोविड टास्क फोर्सचे सल्लागार फेंग जिजियान म्हणाले की, देशातील ६० टक्के लोकसंख्या किंवा ८४ कोटीहून अधिक लोकांना संसर्ग होऊ शकतो. इतर देशांप्रमाणे चीन आता अत्यंत संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सामना करत आहे. तो पहिल्या विषाणूपेक्षा सौम्य आहे. चीनकडे परिस्थिती हाताळण्यासाठी तीन वर्षे होती. पण, लसीकरण करण्याऐवजी आणि लोकांना कोविडसोबत जगण्यासाठी तयार करण्याऐवजी लॉकडाऊनवर अधिक भर दिला आहे.
हाँगकाँग विद्यापीठातील विषाणू तज्ज्ञ जिन डोंग यान म्हणतात की, संसर्गाची सुनामी येणारच आहे. शून्य-कोविड आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही. देशातील संसर्गाची सद्यःस्थिती स्पष्ट नाही. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात १५९ गंभीर रुग्ण आढळून आले. गेल्या आठवड्यापेक्षा हे प्रमाण जवळपास १०० ने अधिक आहे. जिन म्हणतात, बरेच रुग्ण समोर आणले जात नाहीत. असे असले तरी सरकार मोठ्या लाटेला तोंड देण्याची तयारी करत आहे. रुग्णालयांतील अतिदक्षता खाटांची संख्या दुप्पट करण्याचा आणि डॉक्टर, परिचारिकांची संख्या वाढवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. विलगीकरणासाठी यापूर्वी तयार केलेल्या तात्पुरत्या ठिकाणांचे रूपांतर रुग्णालयात केले जात आहे. घाबरून औषधे आणि इतर वस्तू खरेदी न करण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. गरजू लोकांसाठी औषधे राहू करू द्या, असे सांगण्यात आले आहे. बेरोजगारी २० टक्के, तरुणांमध्ये निराशा बीजिंगमधील विद्यापीठातील २१ वर्षीय मँडी लिऊ म्हणते की, देशाचे भविष्य अनिश्चित दिसते. ती पुढच्या वर्षी पदवीधर होईल. तिने नोकरीसाठी ८० हून अधिक अर्ज दिले, पण तिला एकही ऑफर मिळालेली नाही. गेल्या काही आठवड्यांपासून चिनी तरुणांमधील असंतोष स्पष्ट होत आहे. शून्य-कोविड धोरणाविरोधात बीजिंगसह अनेक शहरांत तरुण रस्त्यावर उतरले होते. कोविडचे निर्बंध आता शिथिल झाले असले तरी बेरोजगारीची समस्या कायम आहे. जुलैत १६ ते २४ वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर २०% होता. झाओपिन या जॉब साइटच्या सर्वेक्षणानुसार, २०२२ मध्ये नोकरी मिळालेल्या महाविद्यालयीन पदवीधरांचा पगार २०२१ मध्ये पदवीधरांपेक्षा १२% कमी होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.