आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्ग झपाट्याने वाढतोय:चीनमध्ये दोन वर्षांनंतर 13 हजारांवर नवे बाधित, नवा व्हेरिएंटही आढळला, शांघायचे नागरिक हैराण

चीनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. चोवीस तासांत १३ हजारांहून जास्त बाधित आढळून आले आहेत. कोरोना काळातील एका दिवसातील संख्येपेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार लक्षणे असलेले १४५५ रुग्ण होते तर विनालक्षणाची ११ हजार ६९१ रुग्ण आढळून आले. संसर्गामुळे नवा मृत्यू झाल्याची नोंद मात्र अद्याप नाही. नवे बाधित आढळण्यामागे नवा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विषाणूचा नवा व्हेरिएंट शांघायपासून ७० किमीवर आढळून आला आहे. हा व्हेरिएंट आेमायक्रॉन बीए १.१ पासून विकसित झाला आहे. नव्या व्हेरिएंटचा चीनमधील कोरोना विषाणूशी संबंध दिसत नाही, असा दावा करण्यात आला आहे. देशातील एकूण बाधितांपैकी आर्थिक राजधानी शांघायमध्ये ८ हजार बाधित आढळले. म्हणूनच सर्व २.५ कोटी नागरिक जणू कैद झाले आहेत.

आपली लस सुरक्षित व प्रभावी : भारत बायोटेक
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनमध्ये त्रुटी असल्याचे सांगून कोव्हॅस कार्यक्रमातून ही लस वगळली. या कारवाईनंतर लस निर्माती कंपनी भारत बायोटेक म्हणाली, कोव्हॅक्स कोविडपासून संरक्षणासाठी सुरक्षित व प्रभावी आहे. कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्यांचे प्रमाणपत्रही वैध आहे. आता कंपनीचा लस निर्मितीचा वेग मंदावला आहे.