आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • In China, More Than 6 Lakh Corona Patients! Information Leaked From National University Of Defense Technology

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाैप्यस्फाेट:चीनमध्ये 84 हजार नव्हे, 6.4 लाख हाेते रुग्ण! नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नाॅलाॅजीतून माहिती लीक

बीजिंगएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
वुहानमध्ये व्यापक तपासणी सुरू झाली - Divya Marathi
वुहानमध्ये व्यापक तपासणी सुरू झाली
  • हेही वास्तव ..चीनच्या 230 शहरांत कोरोनाबाधित रुग्ण, काेराेनाबाधितांची संख्या दडपण्याचा आराेप

चीन काेराेना विषाणू संसर्गाची माहिती दडवत आहे? हा प्रश्न दाेन-तीन महिन्यांपासून चर्चिला जात आहे. परंतु आजवर त्याचे ठाेस पुरावे मिळत नव्हते. आता मात्र चीनचा खाेटारडेपणा सिद्ध करणारा एक अहवाल उजेडात आला आहे.

चीन सांगताेय त्याप्रमाणे या देशात ८४ हजार नव्हे, तर ६.४ लाख लाेक काेराेनाने बाधित हाेते. हा दावा लष्कराच्या नेतृत्वाखाली संचालित नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नाॅलाॅजीमधून लीक झाला.

लीक डेटानुसार संसर्ग वाढल्यानंतर रुग्णसंख्या ६.४ लाखांवर पाेहाेचली हाेती, परंतु चीनने मात्र ८४ हजार २९ बाधित असल्याचे मान्य केले हाेते. या लीक डेटामध्ये देशात २३० शहरांतील ६.४ लाख लाेकांची माहिती आहे.

प्रत्येक एन्ट्रीमध्ये पडताळणी झालेले रुग्ण, तारीख आणि त्यांच्या ठिकाणाची माहिती इत्यादी तपशील आहे. सुरुवातीपासून एप्रिलपर्यंतची आकडेवारी त्यात नमूद आहे. प्रत्येक एन्ट्री कमीत कमी एका रुग्णाशी जाेडलेली आहे, असे मानले जाते.

फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंतची आकडेवारी जाहीर

फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून एप्रिलपर्यंतची आकडेवारी त्यात नमूद आहे. लाेकेशनमध्ये रुग्णालय, रहिवासी अपार्टमेंट, हाॅटेल, सुपरमार्केट, रेल्वेस्थानक, रेस्तराँ, शाळा एवढेच नव्हे तर फास्टफूड चेनच्या शाखेचाही समावेश आहे. प्रत्येक एन्ट्री कमीत कमी एका रुग्णाशी जाेडलेली आहे, असे मानले जाते. त्यावरूनच देशात किमान ६.४ लाख काेराेनाबाधित हाेते हे स्पष्ट हाेते.

वुहानमध्ये व्यापक तपासणी सुरू

चीनमध्ये काेराेना विषाणूचे २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात विनालक्षणाच्या १३ रुग्णांचा समावेश आहे. आराेग्य अधिकारी म्हणाले, वुहान शहरात माेठ्या प्रमाणात लाेकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. येथून या संसर्गाला सुरुवात झाली हाेती. चीनच्या राष्ट्रीय आराेग्य आयाेगाने (एनएचसी) याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी आढळून आलेल्या ८ पैकी ६ रुग्ण िवनालक्षणांचे आहेत.णे जिलिन प्रांतात बाधित आढळून आल्यानंतर लाॅकडाऊन लावण्यात आला. हुबेई प्रांत, वुहानमध्ये शुक्रवारपर्यंत काेराेनाचे विनालक्षणाचे ४३९ रुग्ण आढळले.

सार्वजनिक साधनांद्वारे डेटा संलग्न

काेराेनाबाधितांची संख्या ६.४ लाखांहून जास्त किंवा कमीदेखील असू शकते, असेही मानले जाते. डेटा कशा प्रकारे संकलित करण्यात आला आहे हे मात्र त्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे डेटा विविध सार्वजनिक साधनांचा वापर करून संकलित केल्याचे जाहीर केलेले आहे. यात काेणाचीही नावे नाेंदवण्यात आलेली नाहीत. रुग्णाची पडताळणी शक्य नाही. यादरम्यान चीनवर आराेप सुरू आहेत. काेराेनाबाधितांची संख्या दडपण्याचा आराेप चीनवर आहे. मात्र काेराेनावर नियंत्रण मिळवण्यात आम्हाला यश मिळाले आहे.

प्रयाेगशाळेने सुरुवातीचे नमुने नष्ट केले हाेते : वरिष्ठ अधिकारी

डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या अनेक प्रयाेगशाळांनी काेराेनाच्या सुरुवातीस रुग्णांचे नमुने नष्ट केले हाेते. याबाबतची माहिती राष्ट्रीय आराेग्य आयाेगाचे वरिष्ठ अधिकारी लियू डेनफेंग यांनी जाहीर केली. जैवसुरक्षेचा विचार करून हे करावे लागले. देशातील अनेक प्रयाेगशाळा संसर्ग राेगांचे नमुने सांभाळण्यास तयार नाहीत. अशा राेगांचे नमुने, साठवणूक, अभ्यास व त्यांना नष्ट करण्याचे निकष अत्यंत कडक ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेच त्यांना एकतर व्यावसायिक संस्थांकडे साेपवले जाते िकंवा नष्ट केले जाते. वास्तविक सुरूवातीच्या टप्प्यात कोरोना बाधितांना दुसऱ्या श्रेणीतील न्यूमोनिया मानून उपचाराची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फेब्रुवारीत सरकारने नमूने घेणाऱ्या प्रयोगशाळांना विना परवानगी नमुने कोणत्याही संशोधन संस्था किंवा प्रगत प्रयोगशाळांकडे सोपवले जाऊ नयेत, असे आदेश दिले होते. म्हणूनच या प्रयोगशाळा या अनधिकृत नमुन्यांना आपल्या स्तरावर नष्ट करत असत किंवा नगर पालिकांना साठवणूक करण्यासाठी पाठवून देत असत. त्यातून संसर्ग प्रचंड वाढल्याचे तज्ञांना वाटते. चीनचे वैद्यकीय अधिकारी मात्र हा दावा मान्य करत नाहीत. डेनफेंग यांनी कबुलीत अनधिकृत प्रयोगशाळांनी हे नमूने कशा प्रकारे संकलित केले याची माहिती मात्र जाहीर केली नाही.

बातम्या आणखी आहेत...