आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1000 पर्यटक दररोज येतात संग्रहालयात:कोलंबियामध्‍ये आता दृष्टिहीनही जाणून घेतील वाॅटर म्युझियम

बगोटा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र दक्षिण अमेरिकी देश कोलंबियाच्या मेडेलिनमधील वॉटर इंटरॅक्टिव्ह म्युझियमचे आहे. विद्यार्थ्यांत याची खूप चर्चा होत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, हे असे म्युझियम आहे, जिथे दृष्टिहीनही येथे लावलेले प्रदर्शन आणि परस्परसंवादी ज्ञानाचा आनंद घेऊ शकतील. हे पाहण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. या संग्रहालयात सांगितले जाते की, पाणी किती मौल्यवान आहे. येथे नऊ वेगवेगळ्या डार्क रूम आहेत. डार्क रूममध्ये ब्रह्मांडाचा जन्म आणि ग्रहांचा विकास, जैवविविधतेसह विज्ञान, कला आणि तंत्रज्ञानाचे विषयही लायटिंगद्वारे प्रदर्शित केले आहेत. याशिवाय वॉटर म्युझियममध्ये कोलंबितयातील वन, मैदाने आणि वाळवंटासह विविध परिसंस्था दाखवण्यात आल्या आहेत. हे लोकांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरले आहे. जगातील अशा प्रकारचे हे पहिले संग्रहालय आहे.

बातम्या आणखी आहेत...