आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • PM Modi In Denmark: Visits Indian Community Before Leaving Berlin, Gives Autographs; People Also Expressed Their Love For Him

पंतप्रधान मोदी डेन्मार्कमध्ये:म्हणाले -भारताने कोरोनाची स्वस्त व प्रभावी लस दिली नसती तर जगाचे काय झाले असते

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 दिवसीय यूरोप दौऱ्यात मंगळवारी डेन्मार्कला पोहोचले. तिथे डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी त्यांचे स्वागत केले. मेटे यांच्याशी विविध मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर मोदींनी तेथील बेला सेंटरध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यात त्यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेची जोरदार प्रशंसा केली. ते म्हणाले -भारताने कोरोनावरील स्वस्त व प्रभावी लस दिली नसती तर जगाचे काय असते?

मला मिळालेल्या शुभेच्छा तुम्हाला समर्पित

आपल्या संबोधनात मोदी म्हणाले -तुम्ही डेन्मार्कचे पंतप्रधान व माझे भव्य स्वागत केले. त्यासाठी सर्वांचे आभार. मला मिळालेल्या सर्व शुभेच्छा तुम्हाला समर्पित. आज पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांचे येथे येणे हे त्यांच्या मनात भारतीयांबद्दल असलेल्या प्रेमाचे प्रतिक आहे.

मोदींनी आपल्या भाषणात डेन्मार्कमधील सर्वच भारतीयांचे आभार मानले.
मोदींनी आपल्या भाषणात डेन्मार्कमधील सर्वच भारतीयांचे आभार मानले.

सभागृहात मोदी-मोदीचे नारे

सभागृहात कुणी पंजाबी, गुजराती, बंगाली, ओडिया आदी अनेक भाषिक नागरिक जमलेत. भाषा कोणतीही असली तरी आपल्या सर्वांवर एकच भारतीय संस्कार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी सभागृहात मोदी-मोदीचे नारे सुरू होते.

ते पुढे म्हणाले -आपल्या जेवणाची थाळी बदलते, पण वारंवार आग्रह करण्याची पद्धत बदलत नाही. काही लोक तर मीठाचाही आग्रह धऱतात. आपण राष्ट्र बांधणीत एकसंध असतो. सबका साथ, सबका विश्वास व सबका प्रयास. वसुधैव कुटूंबकम म्हणजे अवघे विश्वच माझे घर. आपली ही संकल्पना हिमालयाहून उंच आहे.

विल्ला सेंटरमध्ये उपस्थित भारतीय समुदाय. पंतप्रधानांच्या भाषणावेळी सभागृहात मोदी-मोदीचे नारे सुरू होते.
विल्ला सेंटरमध्ये उपस्थित भारतीय समुदाय. पंतप्रधानांच्या भाषणावेळी सभागृहात मोदी-मोदीचे नारे सुरू होते.

तत्पूर्वी, बर्लिन सोडण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाची भेट घेतली. त्यांनी लोकांना केवळ ऑटोग्राफच दिले नाहीत, तर हात जोडून त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. त्यावेळी भारतीय समुदायातील लोकांनीही त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त केलं.

पंतप्रधान मोदी कोपनहेगनमध्ये पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेणार आहेत. हरित धोरणात्मक संदर्भात भागीदारी आणि द्विपक्षीय संबंध हे या बैठकीचे प्रमुख मुद्दे असतील. यासोबतच ते भारत-डेन्मार्कच्या गोलमेज बैठकीत सहभागी होणार असून डेन्मार्कमधील भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत.

एक प्रसिद्धीपत्रक जारी करून पंतप्रधान कार्यालयाने डेन्मार्क दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन यांच्या भेटीव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी दुसऱ्या इंडो-नॉर्डिक शिखर परिषदेतही सहभागी होतील. डेन्मार्क व्यतिरिक्त या शिखर परिषदेत फिनलंड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडन यांचा समावेश आहे.

शिखर परिषदेत आर्थिक सुधारणा आणि हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर भर

इंडो-नॉर्डिक शिखर परिषदेत आर्क्टिक क्षेत्रातील आर्थिक सुधारणा, हवामान बदल, नावीन्य, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि भारत-नॉर्डिक सहकार्य यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय पीएम मोदी फिनलँड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडनच्या राज्यप्रमुखांनाही भेटणार आहेत.

2018 च्या इंडो-नॉर्डिक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.
2018 च्या इंडो-नॉर्डिक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

नॉर्डिक देश भारतासाठी शाश्वतता, रिन्युएबल उर्जा, डिजिटायझेशन आणि इनोव्हेशनमध्ये महत्त्वाचे भागीदार आहेत. 3 आणि 4 मे रोजी डेन्मार्कचा दौरा आटोपून परतत असताना पंतप्रधान मोदी फ्रान्सलाही जाणार आहेत. येथे ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे दुसऱ्यांदा झालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करतील.

भारत आणि जर्मनी दरम्यान हरित ऊर्जेबाबत महत्त्वपूर्ण करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. यामध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जेबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. पीएम मोदी म्हणाले- भारत आणि जर्मनी मिळून ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स तयार करतील.

बैठकीनंतर भारत आणि जर्मनीचे शिष्टमंडळ एकत्र उपस्थित होते.
बैठकीनंतर भारत आणि जर्मनीचे शिष्टमंडळ एकत्र उपस्थित होते.

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांदरम्यान शाश्वत विकासावर एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत भारताला 2030 पर्यंत स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी $ 10.5 अब्जची आर्थिक मदत मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...