आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत भोजन योजनेत भेदभाव:इंग्लंडमध्ये सरकारच्या तुलनेत खासगी शाळांतील मुलांची 90 % जास्त कमाई

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडमध्ये सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांत शिकणारे विद्यार्थी मोठेपणी जास्त कमाई करतात. त्यांची कमाई तुलनेने सरासरी ९० टक्के एवढी जास्त असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाकडून अलीकडेच ३.८ कोटी विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. गरीब व श्रीमंत वर्गातील मुलांच्या उत्पन्नातील दरी सातत्याने वाढ चालली आहे, असे अभ्यासातून दिसून आले आहे. मोफत भोजन योजनेचा लाभ मिळणाऱ्या शाळेतील मुले पुढच्या काळात उच्च शिक्षण घेण्यात पिछाडीवर पडतात हे त्यामागील मुख्य कारण मानले जाते. कारण ते महाविद्यालय किंवा विद्यापीठातील खर्च उचलण्यास समर्थ नसतात. अशी मुले खासगी शाळेत शिकली तरी त्यांची योग्यता खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांएवढी नसते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांच्या उत्पन्नातदेखील तफावत असते.

२२ व्या वर्षांपर्यंत कमाईत अंतर
डेटानुसार मोफत भोजन असलेल्या शाळेत शिकलेली मुले आणि खासगी शाळेतील मुलांच्या उत्पन्नात वयाच्या १८ वर्षांपर्यंत फार अंतर नसते. परंतु वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत त्यात मोठे अंतर दिसून येते. वयाच्या तिशीपर्यंत हे अंतर ९० टक्क्यापर्यंत वाढते.

बातम्या आणखी आहेत...