आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In Gmail, AI Will Write Your Mail, It Is Possible To Delete Any Person Or Object From A Photo... Without The Viewer Even Knowing.

नवे फीचर:जीमेलमध्ये AI आपला मेल लिहून देईल, फोटोमधून कोणत्याही व्यक्ती अथवा वस्तूला हटवणे शक्य... पाहणाऱ्यास कळणारही नाही

सॅन फ्रासिन्स्को24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेल लिहिण्याचा आपणास कंटाळा येतो का? मग आपण विषय सांगताच आपोआप मेल टाइप झाला तर... किंवा एखाद्या संस्मरणीय ग्रुप फोटाेतून नावडत्या व्यक्तीला काढून टाकावे आणि पाहणाऱ्यास ते कळूही नये.. ही कल्पना टूल्स गुगल उपलब्ध करून देणार आहे. वार्षिक I/O कार्यक्रमात मुख्याधिकारी संुदर पिचाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित या नव्या गोष्टींबद्दल प्रथमच माहिती दिली. गुगल बार्डची माहिती जाणून घेऊ या...

हेल्प मी राइट : एआय आधारित या फीचरमुळे क्षणार्धात आपला मेल लिहून मिळेल. उदा. निमंत्रण द्यावयाचे झाल्यास तारीख आणि ठिकाण सांगताच अचूक मेल लिहून मिळेल. मजकूर आवडला नाही तर त्यात सुधारणा करण्यासही सांगता येईल. मेलची भाषा अधिक औपचारिक करणे किंवा मजकूर वाढवणे अथवा कमी करण्यासही सांगता येईल.

मॅजिक इरेझर : गुगल फोटोजमध्ये मॅजिक इरेझर विथ मॅजिक एडिटर फीचरमुळे छायाचित्रातील कोणत्याही व्यक्तीचा फोटो काढून टाकणे शक्य होईल. उरलेल्या मोकळ्या जागेचे एडिटिंग अशा सफाईदारपणे होईल की पाहणाऱ्यास कळणारही नाही. छायाचित्रात आकाशाचा रंगही बदलता येईल.

एआय आधारित उत्तरे : गुगल सर्चमध्ये एआयद्वारे दिली जाणारी उत्तरेही मिळतील. युजरने एखाद्या विषयात स्वारस्य दाखवले तर, त्या संबधित प्रश्नही सर्चमध्ये सुचवले जातील. युजरला हवामानाची माहिती हवी असेल तर त्याला सर्चमध्ये ८ दिवसांचा अंदाजही दिसेल. कन्व्हर्सेशनल मोडमध्ये तो युजरचे जुने प्रश्न स्मरणात ठेवेल, जेणेकरून पुढील प्रश्न सहजपणे विचारता येतील.

संपूर्ण प्रवास अॅडव्हान्समध्ये पाहता येतील : नॅव्हिगेशन सोपे करण्यासाठी मॅप्समध्ये इमर्सिव्ह व्ह्यूला नॅव्हिगेट केल्यानंतर थ्रीडी व्ह्यू मिळेल. तुम्ही सायकल चालवत असो की वाहन, तुमची संपूर्ण ट्रिप आधीच (प्रिव्ह्यू) पाहता येईल. इतकेच नव्हे तर युजर्स एखाद्या विशिष्ट क्षेत्रात कोणत्याही दिवशी आणि वेळेनुसार हवामान, ट्रॅफिक आणि हवेच्या गुणवत्तेची त्या क्षणाची माहिती मिळवू शकतील.

मेड पाम २ : युजर्सना मेडिकल रिपोर्ट‌्स सोप्या शब्दांत समजावू शकेल
गुगलद्वारे उपचारांचे सल्ले घेण्यात धोका असतो, ही धारणा गुगलने पाम २ च्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मेड पाम २ कंपनीच्या एआय प्लॅटफॉर्मची दुसरी आवृत्ती आहे. ती वैद्यकीय प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी डिझाइन केली आहे. युजरला एक्स-रे वा रिपोर्ट समजावून घेण्यासाठी डॉक्टरची गरज असते. हे फीचर रिपोर्टमधील मुख्य मुद्दे सोप्या शब्दांत समजावेल. तूर्त हे मॉडल लिखित मजकूर समाजावते. भविष्यात मेडिकल रेकॉर्ड, सीटी स्कॅनही समजावून सांगेल.