आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्की:इस्तंबूलमध्ये 35 वर्षांनंतर मार्चमध्ये सर्वाधिक हिमवृष्टी, थंडीमुळे शाळांना सुटी देण्यात आली

इस्तंबूल7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कीतील अनेक शहरांत गेल्या ५ दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. राजधानी इस्तंबूलमध्ये जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाल्याने आणि कडक थंडीमुळे शाळांना सुटी देण्यात आली. ही १९८७ नंतर मार्चमधील सर्वात मोठी हिमवृष्टी आहे. शहरात दोन दिवसांत ५० सेंमी हिमवृष्टी झाली आहे. ती १७ मार्चपर्यंत सुरू राहील.

हवामान खात्याने सांगितले की वायव्य, मध्य आणि उत्तर भारतात मंगळवारपासून पारा ३ दिवस वाढेल. दिल्लीत मंगळवारी आणि बुधवारी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत कमाल तापमान ३६ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते, तर कर्नाटक किनारपट्टी, नैऋत्य राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्म्याची शक्यता आहे. गुजरातेत दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...