आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:जपानमध्ये 70% मुले तणावात, 22% बाहेर जाण्यासही घाबरताहेत

टाेकियाे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमध्ये ७० टक्क्यांहून जास्त शालेय मुले काेराेना विषाणूमुळे तणावग्रस्त झाली आहेत. जपान सरकार संचालित नॅशनल सेंटर फाॅर चाइल्ड हेल्थ अँड डेव्हलपमेंट यांच्याअंतर्गत एक राष्ट्रीय पाहणी करण्यात आली. त्यात ही बाब स्पष्ट झाली. पाहणीत ७ ते १७ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे ७२ पालक म्हणाले, विषाणू त्यांचे वाईट करेल, असा विचार मुले करू लागली आहेत. त्यामुळे मुलांची एकाग्रता ढळू लागली आहे. ९ टक्के लाेकांनी काेराेना काळात मुलांनी स्वत:ला इजा करून घेण्याचे आणि पाळीव जनावरांना मारहाण केल्याचे कबूल केले.

३२ टक्के लाेक म्हणाले, घरातील काेणाला बाधा हाेऊ नये असे त्यांना वाटते. संसर्ग झाल्याची माहिती मुलांपासून गुप्त ठेवली जाईल. काेराेनातून मुक्त झालेल्या लाेकांसाेबत फिरणे किंवा खेळायला आवडणार नाही असे मत २२ टक्के लाेकांनी व्यक्त केले. जपानच्या या मेडिकल इन्स्टिट्यूटने १५ जून ते २६ जुलैदरम्यान महामारीचा मुलांवर काय परिणाम हाेताे याबाबत आॅनलाइन पाहणी केली हाेती. या निष्कर्षाविषयी बालराेगतज्ञ मायूमी हंगाई म्हणाले, अशा परिस्थितीत मुलांना माेकळेपणाने बाेलू द्या. त्यांच्याशी चर्चा करा. म्हणजे त्यांच्यात चिडचिडेपणा, हिंसक वृत्ती किंवा नकारात्मकता येणार नाही. पालकांनी मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यातून तणाव कमी हाेऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...