आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानच्या महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभात केस कापून न येणे विद्यार्थ्यांसाठी महागात पडत आहे. यानंतर येथे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. महाविद्यालय व्यवस्थापनावर भेदभाव केल्याचा आरोप होत आहे. जपानमध्ये एका महाविद्यालयाच्या पदवी प्रदान समारंभात एक विद्यार्थी त्याच्या आफ्रिकी-अमेरिकी वंशाच्या वडिलांप्रमाणे कॉर्नरोज(कुरळ्या केसांवर वेणीसारखे केस) बांधून समारंभात आला होता. या १८ वर्षीय विद्यार्थ्याचे आई-वडील दोघे जपानी होते,त्यामुळे त्यांनी त्याला नैसर्गिक कुरळे केस सुधारण्यासाठी कॉर्नरोजमध्ये बांधून पाठवले होते. हे पाहून महाविद्यालय प्रशासनाने त्याला मुलांपासून वेगळे बसवले आणि सांगितले की, मंचावरून त्याचे नाव पुकारल्यास उभे राहून मंचावर जाऊन नकोस. जपानमध्ये पदवी प्रदान समारंभासाठी कडक नियम आहेत. यावर आता टीका सुरू झाली आहे.
नियमांचे पालन न केल्याने असे केले : व्यवस्थापन विद्यार्थ्याच्या आरोपानुसार, हा माझा विशेष दिवस नाही,असे मला वाटले. ही केशरचना ब्लॅक कम्युनिटीत माझ्या वडिलांची संस्कृती दाखवते. या समारंभाशी संबंधित प्रकरणात महाविद्यालयाच्या उपप्रमुखांनी सांगितले की, नियमांचे पालन न केल्याने विद्यार्थ्यास वेगळे बसवावे लागले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.