आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानमध्ये हजारो घरांमध्ये कचऱ्याचा ढिग साचला आहे. ठासून भरलेला कचरा आणि मालकांकडून छोट्या-छोट्या वस्तूही घराबाहेर न फेकण्याच्या समस्येला जपानमध्ये गोमी याशिकी म्हटले जाते.
वृद्ध होणारी लोकसंख्या आणि जपानमधील एकल कुटुुंबांनी या समस्येत आणखी भर टाकली आहे. कोविडमध्ये अंतर राखणे आणि घरात राहण्याच्या आवश्यकतेमुळे ही समस्या आणखी गंभीर केली आहे. नैराश्य आणि वाईट अनुभवासारख्या मानसिक समस्यांशिवाय शहरांत राहण्यासाठी खूप छोटी जागा आणि कामाच्या दबावात घराच्या स्वच्छतेला वेळ न मिळणे ही या समस्येला कारणीभूत आहे. टोकियोत अशा घरांची कचऱ्यापासून सुटका करण्यासाठी तोरू कोरेमुरा यांनी रिस्क बेनेफिट नावाची फर्म सुरू केली आहे. ते आपल्या टीमसोबत दुर्गंधीयुक्त घरात घुसून स्वच्छ करतात. अनेकदा त्यांना अशा घरांची स्वच्छ करावे लागते, जिथे कोदोकुशी झाली होती. म्हणजे, तिथे राहणाऱ्या एकट्या व्यक्तीचा काही आठवड्यांआधी मृत्यू झाला आहे. खोलीत छतापर्यंत भरलेल्या कचऱ्यात प्लास्टिक बॅग, कॅन,बॉटल, वृत्तपत्र, जंक फूड रॅपर असतात. अनेकदा ऑनलाइन शॉपिंगची शेकडो पाकिटेही असतात जे कधी उघडलेही नाहीत. कोरेमुरा यांच्यानुसार, एकाकी मृत्यू पावणाऱ्या लोकांपैकी ७०% गोमी याशिकीमध्ये राहत असतात. जपान सरकारने यावर एक सर्व्हे केला आहे.
घरात कचरा जमा करण्याची सवय मानसिक विकार अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने २०१३ मध्ये अशा पद्धतीने जुने सामान जमा करण्याच्या सवयीला होर्डिंग डिसऑर्डरच्या श्रेणीत ठेवले. जपानमध्ये ६५ वर्षांवरील प्रत्येक पाचपैकी एक एकटा राहतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.