आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोजी उचिदा यांनी वयाच्या सत्तरीत प्रवेश केल्यानंतर ते नेहमी कुठेतरी हरवून जात असत. पहिल्यांदा पोलिसांना ते घरापासून २७ किमी दूर व्हेंडिंग मशीनजवळ बसलेले आढळले. एकदा तर ते दोन दिवस बेपत्ता होते. एका अनोळखी घरात ते उपाशी राहिले होते. त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता. आपले नाव आणि पत्ताही कधीकधी आठवत नसे. हे पाहून उचिदा यांच्या कुटुंबाने त्यांना डिजिटल निगराणीत ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे केली.
ओसोकाचे उपनगर इटामी येथे उचिदा यांचे कुटुंब राहते, तेथे रस्त्यांवर १००० पेक्षा जास्त सेन्सर लावलेले आहेत. प्रत्येक युनिट वाय-फाय सुविधेने सज्ज आहे. उचिदा जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा ही सिस्टीम त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवलेल्या बीकनद्वारे (रेडिओ सिग्नल पाठवणारे डिव्हाइस) रेकॉर्डिंग सुरू करते. त्यामुळे उचिदांच्या कुटुंबाला त्यांच्या लोकेशनबाबत अलर्ट्स मिळतात. खूप उशिरापर्यंत घरी आले नाहीत तर कुटुंबीय त्यांना सहज शोधू शकतात. इटामीप्रमाणेच जपानची अनेक मोठी शहरे आणि उपनगरे आता इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग सिस्टीमने अपडेट झाले आहेत. कारण जपान जगात सर्वात वेगाने वृद्धावस्थेकडे जात असलेला देश आहे. अनेक ज्येष्ठ स्मृतिभ्रंशाच्या समस्येने त्रस्त आहेत. या समस्येत ट्रॅकिंग सिस्टीम उपयुक्त ठरत आहे. जपानमध्ये लोक प्रायव्हसीबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांच्या आत्मप्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांची परवानगी घेतली जाते. जपानमध्ये सध्या ५० लाखांवर लोक स्मृतिभ्रंशाने त्रस्त आहेत.
गेल्या एक दशकात स्मृतिभ्रंशाबाबत लोकांच्या मानसिकतेत बदल
४६ वर्षीय मिकी सातो सांगतात की गेल्या एक दशकात स्मृतिभ्रंश पीडितांबाबत लोकांच्या मानसिकतेत सुधारणा झाली आहे. या समस्येने पीडित लोकांसोबत काम करण्याची संधी देत असलेल्या कंपनीशी त्यांचा संबंध आहे. अशा लोकांना फक्त विश्वास गरजेचा आहे. त्यामुळे जीपीएस व इतर डिव्हाइसपासून ते लांब राहतात. सातो यांनी एक अॅप डिझाइन करवून घेतले आहे, हे अॅप स्मृतिभ्रंश पीडितांना सामान्य आयुष्य व्यतीत करण्यासाठी मदत करते. त्यासाठीही युजरच्या मंजुरीसोबत ट्रॅकिंगची सुविधा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.