आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जापानमध्ये भूकंप:फुकुशिमामध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप; संपूर्ण देशात जाणवले धक्के, त्सुनामीचा धोका नाही

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2011 मध्ये भूकंपानंतर त्सुनामीमुळे झाले होते 16 हजार मृत्यू

जापानमध्ये शनिवारी संध्याकाळी 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. हे झटके संपूर्ण देशात जाणवले. मात्र सर्वात जास्त परीणाम फुकुशिमा प्रांतात झाला. फुकुशिमामध्ये मोठा न्यूक्लियर प्लांट आहे. लोकल मीडियानुसार, प्लांटमध्ये आतापर्यंत कोणतीही असामान्य गोष्ट आढळली नाही. एक्सपर्टची टीम प्लांटचे निरीक्षण करण्यासाठी पोहोचली आहे. जापानची मेटेरोलॉजिकल एजेंसीने म्हटले आहे की, या भूकंपाने त्सुनामीचा धोका नाही.

भूकंपाचे केंद्र राजधानी टोकयोपासून जवळपास 306 किलोमीटर दूर जमिनीपासून 60 किमी खोल होते. या ठिकाणी 10 वर्षांपूर्वी मोठा भूकंप आला होता. तेव्हा आलेल्या त्सुनामीच्या लहरींनी फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांट उद्धवस्त झाला होता. ही पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात मोठी घटना मानली गेली होती.

2011 मध्ये भूकंपानंतर त्सुनामीमुळे झाले होते 16 हजार मृत्यू
जापानमध्ये मार्च 2011 मध्ये 9 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपामुळे जबरदस्त त्सुनामी आला होता. तेव्हा समुद्रात उठलेल्या 10 मीटर उंचीच्या लहरींनी अनेक शहरात गदारोळ उडाला होता. यामध्ये जवळपास 16 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हे जापानमध्ये भूंकपामुळे झालेले सर्वात मोठे नुकसान मानले जाते.

रिंग ऑफ फायरवर वसले आहे जापान
जापान भूकंपाच्या सर्वात जास्त सेंसेटिव्ह एरियामध्ये आहे. हे पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये येते. रिंग ऑफ फायर असा परिसर आहे जिथे कॉन्टिनेंटल प्लेंट्ससह ओशियनिक टेक्टॉनिक प्लेंट्सही आहेत. या प्लेट्स एकमेकांना टक्कर देता तेव्हा भूकंप येतो. याच्या परिणामामुळेच त्सुनामी येतो आणि ज्वालामुखीही निर्माण होतो. जगातील 90% भूकंप याच रिंग ऑफ फायरमध्ये येतात.

रिंग ऑफ फायरचा परिणाम न्यूझीलंडपासून जापान, अलास्का आणि उत्तर आणि साउथ अमेरिकेपर्यंत पाहिले जाऊ शकते. 15 देश या रिंग ऑफ फायरमध्ये येतात. हा परिसर जवळपास 40 हजार किलोमीटरमध्ये पसरला आहे. जगात जेवढे अॅक्टिव्ह वॉल्केनो आहेत, त्यामधून 75% याच परिसरात आहेत.

बातम्या आणखी आहेत...