आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावध व्हा:अनेक देशांच्या मुलांत विषाणूची रहस्यमय लक्षणे, नव्या प्रकारचा सिंड्रोम येत आहे 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणूपासून मुलांना कमी धोका ही संकल्पना चुकीची ठरतेय

अँड्रयू जेकब्स, एडगर सेंडोव्हल

अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या विळख्यात आता लहान मुलंही येऊ लागली आहेत, यामुळे तज्ञ जास्त चिंतित आहेत. न्यूयॉर्क शहरात शनिवारी तीन मुलांचा मृत्यू झाला असून ७३ मुलं आजारी आहेत. मागच्या आठवड्यापासून अशी प्रकरणं समोर येत आहेत. न्यूयॉर्क, लुइसियाना, मिसीसिपी, कॅलिफोर्नियामध्ये या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. या आजारामुळे त्वचा आणि डोळ्यांमध्ये खाज येते. रक्तनलिका आणि हृदयावर परिणाम होतो. मुलांची स्थिती गंभीर होते. अनेकांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे.

न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू कुओमो यांनी तीन मुलांच्या मृत्यूची बातमी देताना सांगितले की, हा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. श्वास घेण्याला त्रास होण्यासारखी कोरोनाची कोणतीच लक्षणं या मुलांमध्ये दिसली नाहीत. पण, या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आलीय. आतापर्यंत सर्व पालक आणि वैद्यकीय तज्ञ निश्चिंत झाले होते की मुलांपर्यंत कोरोना पोहोचला नाहीये. पण, ही शक्यता मागच्या आठवड्यापासून संपुष्टात आलीय. तेव्हा न्यूयॉर्कमध्ये पाच वर्षांच्या एका मुलाचा या सिंड्रोममुळे मृत्यू झाला. मागच्या आठवड्यात कोहेन मेडिकल सेंटरच्या लांग आयलँडने सांगितले की, त्यांच्याकडे लाल जीभ, हृदयातील धमण्यांचा आकार वाढणे सारख्या लक्षणांनी प्रभावित २५ मुलांवर उपचार केले आहेत. ताप, ओटीपोटात दुखणे, शरीरावर डाग पडणे अशी काही लक्षणे कावासाकी रोगासारखीच आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूचा हृदयावर परिणाम होतो याबद्दल मतभेद आहेत. कावासाकी या आजारात झटका येण्याचं प्रमाण दुर्मिळ आहे पण कोरोना वायरसच्या सिंड्रोमने प्रभावित अनेक मुलं झटका आल्याप्रमाणे बेशुद्ध आहेत. त्यांचा रक्तदाब कमी होता. ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची प्रकियाही मंदावली होती.

न्यूयॉर्कमध्ये डॉक्टरांनी निरीक्षण केले आहे की, अनेक भागांमध्ये कोविड-१९ च्या प्रभावात वाढ झाल्यानंतर एक महिन्यानंतर असा नवा सिंड्रोम समोर आला आहे. तज्ञांच्या मते, स्टेरॉइड, इम्युनोग्लोबलिन, अॅस्पिरिन आणि अँटिबायोटिक तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करून यावर उपचार करणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात व्हेटिंलेटरवर असणाऱ्या मुलांचे व्हेटिंलेटर काढण्यात आले. अजून या नव्या सिंड्रोमबद्दल संशोधन सुरू आहे, पण हे सर्व गंभीर आहे कारण यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्याची प्रक्रियाही प्रभावित होते. काही मुलं आजारी पडली, पण काही मुलांना काहीच त्रास झाला नाही. काही प्रभावित मुलांची प्रकृती एकदम चांगली होती. यामुळे या सिंड्रोमचा आनुवंशिकतेशी काही संबंध असेल अशी शक्यता वाटत नाही.

ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा

अमेरिकेसह अनेक राज्यांत तसेच काही युरोपीय देशांमध्ये मुलामंध्ये काही संशयास्पद लक्षणं दिसल्याने आता कोरोना विषाणूने पुन्हा धोक्याची घंटा वाजवली आहे. न्यूयॉर्कचे गर्व्हनर अँड्रयू कुओमो यांचं म्हणणं आहे की, आता सर्व पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे. अधिक काळापर्यंत ताप, पोटदुखी, त्वचेच्या रंगात बदल आणि हृदयात धडधड होत असेल तर त्याकडे गांभीर्याने बघा. कुओमो यांनी शनिवारी त्यांच्या नियमित ब्रीफिंगमध्ये सांगितले की आपण विचार करत होतो की लहान मुलं कोविड-१९ ने प्रभावित नाहीत, पण या विषाणूने आपला मोर्चा कमी वयाच्या व्यक्तींकडे वळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...