आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे पैशांची चणचण जाणवणाऱ्या आणि दोन-तीन वेळा मुहूर्त उलटून गेल्यानंतर लग्न करत असलेल्या अमेरिकी नागरिकांत नवीन ट्रेंड दिसत आहे. वर-वधू लग्नात मिळणाऱ्या भेटवस्तूंऐवजी रोख रकमेची मागणी करत आहेत. कॅथरीन हॉव आणि पॅट्रिक वॉल्श यांनी या वर्षी १७ एप्रिलला लग्न केले तेव्हा त्यांच्याकडे आवश्यक त्या सर्व वस्तू होत्या. नव्हते फक्त स्वत:चे घर! ते खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नव्हती. त्यामुळे त्यांनी निमंत्रण पत्रिकेत लिहिले,‘लग्नाला या, जेवण करा, मिठाई खा, पण तुमची इच्छा असेल तर रोख रक्कम द्या, म्हणजे आम्ही पहिले घर खरेदी करू शकू.’ दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर त्यांना पैशांची गरज आहे आणि ते मागण्यात त्यांना कुठलाही संकोच वाटत नाही. वॉल्श म्हणतात,‘अनावश्यक भेटवस्तू घेण्यापेक्षा आम्ही आमची गरज सर्वांसमोर मांडली.’
एका शिष्टाचार कंपनीचे संस्थापक जोडी स्मिथ म्हणतात, ‘भलेही अमेरिकी संस्कृतीत गिफ्ट म्हणून पैसे स्वीकारण्याचा रिवाज अनेक वर्षांपासून आहे, पण ते खुलेपणाने मागण्यास शिष्टाचार मानला जात नाही. तथापि, आता त्याबाबतचा दृष्टिकोन बदलत आहे.’ वेडिंग प्लानिंग आणि रजिस्ट्री वेबसाइट नॉटनुसार, लग्नाच्या वेळी पैसे मागण्याचा ट्रेंड २०२२ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत गेल्या वर्षाच्या याच अवधीच्या तुलनेत १०% वाढला आहे. झोला या आणखी एका वेबसाइटने २०२० मध्ये वेबसाइटवर कॅश फंड पर्याय सुरू केला होता. त्यात वर-वधू घराचे रिनोव्हेशन, पाळीव प्राणी दत्तक घेणे आणि वर्ल्ड टूर करण्यासाठी रोख रक्कम मागू शकत होते. मोबाइल पेमेंट अॅपने ही सुविधा आणखी सोपी केली आहे. त्याद्वारे मॅनहटनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी पाहुण्यांना त्यांचे गिफ्ट कॅश अॅपमार्फत थेट बँक खात्यात पाठवण्याचा पर्याय दिला होता. त्यांच्या मते, पाहुण्यांना हा प्रकार वेगळाच वाटला. मात्र, त्यातून जोडप्याचे प्राधान्य कशाला हे त्यांना सहजपणे समजते. बर्डी नावाचे मोबाइल पेमेंट अॅप रोख रक्कम पाठवण्यासह डिजिटल कार्ड पाठवण्याचा पर्यायही तयार करत आहे. त्याद्वारे ते पर्सनलाइज्ड मेसेज पाठवू शकतील.
लग्न म्हणजे वसुली नाही, उत्सव; प्रवेशाची किंमत लावू शकत नाही
‘आस्क मिस्टर मॅनर्स’ स्तंभाचे लेखक थॉमस फार्ली म्हणाले, रोकड भेट देण्याची क्रेझ वाढली आहे. कारण, आधुनिक जोडपे वय वाढल्यावर लग्न करतात. लग्नाआधी सोबत राहत आहेत. अशा स्थितीत बहुतांश सामग्री खरेदी केलेली असते. मात्र,लग्न म्हणजे वसुली नाही हे नवविवाहितांनी हे लक्षात घ्यावे. तो उत्सव आहे, ज्यात प्रवेश करण्यासाठी किंमत वसूल केली जाऊ शकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.