आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In Order To Reduce Corruption In Georgia, Reduction Of Staff, Increase In Wages, More Preference For Women In New Recruitment

कर्मचाऱ्यांत घट:जाॅर्जियात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांत घट, वेतनात वाढ, नव्या भरतीमध्ये महिलांना जास्त प्राधान्य

तिबलिसी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाचखाेरी हीच अर्थव्यवस्था बनलेला देश अशी एकेकाळी जाॅर्जियाची आेळख झाली हाेती. भ्रष्टाचार सामान्य जनजीवनाचा एक घटक झाला हाेता. अशी परिस्थिती असतानादेखील पूर्व युराेपातील ३८ लाख लाेकसंख्येच्या या छाेट्या देशाने भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी जगसमाेर वस्तुपाठ मांडला आहे. २००३ मध्ये नागरिक भ्रष्टाचाराच्या विराेधात रस्त्यावर उतरले हाेते. तेव्हा तख्तपालट झाला हाेता. मग निवडणूक होऊन नवे सरकार सत्तेवर आले हाेते. त्यानंतर सर्वात आधी १६ हजारांवर संख्या असलेले वाहतूक पाेलिस दल बरखास्त करण्यात आले. या विभागात तरुण-तरुणींची भरती करण्यात आली. त्यातही महिलांची संख्या जास्त हाेती. कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली. पुरेसे वेतन देण्यात आले. पूर्वी वेतन कमी दिले जात हाेते व कमी वेतनामुळे कर्मचारी लाचखाेरीचा मार्ग निवडताे, असे मानले जात हाेते. परंतु नव्या सरकारने लाच घेताना आढळताच त्याला निलंबित करण्याचे धाेरण राबवले. ऑनलाइन पेमेंटची सुरुवात झाली. विजेची देयके, वाहतूक चलान, शाळा-महाविद्यालयाचे शुल्कही ऑनलाइन दिले जाऊ लागले. परिणामी नवीन सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देशाचे बजेट १२ टक्क्यांनी वाढले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा अभ्यास करणारे याेहान एनवाल म्हणाले, विद्यापीठात डाेनेशनवर प्रवेश दिला जात हाेता. १८० देशांत झालेल्या पाहणीत सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला जाॅर्जिया हा ४५ वा देश आहे.

भ्रष्टाचार बाेकाळल्याने आधी उपासमारीची वेळ जाॅर्जियात भ्रष्टाचार प्रचंड बाेकाळला हाेता. कृषिमंत्र्याने देशाचे गहू विकून टाकले हाेते. म्हणूनच ब्रेडचा तुटवडा जाणवू लागला. लाेकांवर उपासमारीची वेळ आली हाेती. सरकारी मदत लाेकांपर्यंत पाेहोचू शकली नव्हती. शेकडाे मुलांचा थंडीने मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...