आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In Pakistan, 22 Convicts Face Up To Five Years In Prison And 11 Months In Jail For Attacking A Temple

मंदिरावरील हल्ला प्रकरण:पाकिस्तानात मंदिरावरील हल्ला प्रकरणात 22 दोषींना 5 वर्षे कैद, दोषींना 11 महिने तुरुंगात राहावे लागणार

पेशावर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एका दहशतवादप्रतिबंधक न्यायालयाने मंदिरावरील हल्ला प्रकरणात २२ दोषींना प्रत्येकी ५ वर्षे कैदेची शिक्षा व प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठाेठावला. रहिम यार खान जिल्ह्यात हिंदू मंदिरावर हल्ला करण्याच्या प्रकरणात या सर्वांना दोषी ठरवण्यात आले. दोषींना ११ महिने तुरुंगात राहावे लागणार आहे.

पाकिस्तानात अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य केले जाते. त्यातून धार्मिक प्रतिकांची नासधूस करण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. तेथील न्यायालयांनी काही प्रमाणात का होईना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...