आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिष्कार:पाकिस्तानमध्ये मंत्र्यांचा अल्पसंख्याकाविरोधात द्वेष; समारंभावर टाकला बहिष्कार

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये ख्रिश्चन समुदायाने धार्मिक प्रकरणांचे केंद्रीय मंत्री मुफ्ती अब्दुल शकूर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. शकूर यांनी बळजबरीच्या धर्मांतर मुद्दयावर चर्चा करण्यासाठी इस्लामाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अल्पसंख्याकाविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. समारंभात धर्मांतराच्या मुद्दयावर भाषण देण्यासाठी काही नवीन धर्मांतरीत मुस्लिमांना(ख्रिश्चनचे मुस्लिम) बोलवले होते. या कार्यक्रमात त्यांनी आधीचा धर्म म्हणजे ख्रिश्चन व हिंदू धर्माच्या प्रथांविरुद्ध बोलावे यासाठी निमंत्रित केले होते. मात्र, ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी आवाज उठवला आणि समारंभावर बहिष्कार घातला. हा कार्यक्रम केवळ अल्पसंख्याक व त्यांच्या धार्मिक प्रथांविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...