आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संसर्गाशी युद्ध:रशियात पुतीन व अनेक श्रीमंतांनी कोरोना लस टोचून घेतली : निकटवर्तीयांचा दावा

मॉस्को3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सोमवारी क्रिमिया येथील वायुदलाच्या शिपयार्डमध्ये युद्धनौकेचे अनावरण केले. या वेळी त्यांनी व अधिकाऱ्यांनी मास्क घातला नव्हता.
  • रशियन संस्था कोरोनाच्या लसीची सतत करताहेत चाचणी

रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, वरिष्ठ नेते, अधिकारी व श्रीमंतांनी एप्रिलमध्येच कोरोनाची लस टोचून घेतली आहे. निकटवर्तीय सूत्रांनी हा दावा केला. सर्वात आधी रसेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चाचणी म्हणून ही लस टोचून घेतल्याचे समोर आले होते. ही लस शासकीय संस्था गामालेया इन्स्टिट्यूटने बनवली आहे. गेल्या आठवड्यातही तिची चाचणी सैनिकांसह सुमारे ४० जणांवर करण्यात आली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडनेही सांगितले की, रशियात ३ ऑगस्टपासून लसीची तिसरी चाचणी सुरू होईल. या चाचणीत रशिया, सौदी, यूएईतील हजारो नागरिकांचा समावेश असेल. त्यांनी दावा केला की, रशियात सप्टेंबरपासून लस उपलब्ध होईल. रशियात कोरोनाचे ७७७४८६ रुग्ण आहेत. तर १२४२७ मृत्यू झाले आहेत.

संशोधनः फिनलँडच्या शास्त्रज्ञांचा दावा - शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाचा धोका नाही
स्टॉकहोम | शाळा सुरु झाल्यास कोरोना वाढण्याचा कोणताही धोका नसेल असा फिनलँडमधील वैज्ञानिकांनी संशोधनाच्या आधारे हा दावा केला आहे. ते म्हणाले, स्वीडनच्या शाळा सुरु होत्या आणि फिनलँडमध्ये बंद होत्या. असे असूनही, दोन्ही देशांमध्ये १ ते १९ वर्षांदरम्यान बाधित लोकांच्या संख्येत फारसा फरक नव्हता. फिनलँडमध्ये शाळांमध्ये मुलांच्या परस्पर संपर्काने संसर्ग वाढल्याची कोणतीही नोंद झाली नाही. या संशोधनासाठी स्वीडन, फिनलँडमधील आरोग्य संस्थांकडील डेटा गोळा केला गेला.

तयारी : ब्रिटनचा जर्मनी व फ्रान्सच्या कंपन्यांसोबत कोरोना लसीच्या ९ कोटी डोसचा करार
लंडन | संभाव्य कोरोना लसीसाठी ब्रिटनने ९ कोटी डोस करारावर स्वाक्षरी केली आहे. व्यापार मंत्रालयाने सांगितले की, जर्मनीच्या पीफिजर इन्क- बायोटेक अलायन्ससोबत ३ कोटी, फ्रान्समधील व्हॅलनेबासोबत ६ कोटींचा करार केला आहे. पीफिजर इन्क- बायोटेक अलायन्सने यावर्षी १० कोटी डोस तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. व्हॅलेनेवा या लसीची प्री-क्लिनिकल चाचणी घेत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचे २,९४,७९२ रुग्ण आहेत. येथे ४५,३०० मृत्यू झाले आहेत.

श्रीमंतांना ऑफ र: गुंतवणूक करून संसर्ग कमी असलेल्या देशांचे नागरिकत्व घेऊ शकता
अनेक देशातील श्रीमंतांना पुन्हा लॉकडाऊनची भीती सतावतेय. अशात ते कोरोना सोबतचे युद्ध जिंकलेल्या न्यूझीलंड सारख्या देशात राहायला जाऊ शकतात. नागरिकत्व आणि रहिवास सल्लागार फर्म हेनले अँड पार्टनर्स अशा श्रीमंतांची मदत करत आहेत. फर्मचे म्हणणे आहे की, या देशात गुंतवणूक करून लोक नागरिकत्व किंवा राहण्याचा अधिकार मिळवू शकतात. १५ कोटी खर्च करून न्यूझीलंडमध्ये राहणे, शिकणे व कामाचा अधिकार मिळेल. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे आतापर्यंत १५५४ रुग्ण मिळाले आहेत. तर २२ मृत्यू झाले आहेत. तर माल्टामध्ये ११ कोटी रुपये गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येईल. माल्टामध्ये कोरोनाचे केवळ ६७७ रुग्ण आहेत.