आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया:रशियात रासायनिक प्रदूषणामुळे भटक्याकुत्र्यांचा रंग निळा झाल्याने आश्चर्य

मॉस्कोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियातील जर्सिस्क शहरातील विचित्र प्रकार, 6 वर्षांपासून कारखाना बंद

आतापर्यंत पर्यावरण प्रदूषण व हवामान बदलाचे दुष्परिणामांना नैसर्गिक आपत्तीसह विविध रूपांत दिसून आले आहे. परंतु रशियाच्या जर्सिस्क शहरात रासायनिक प्रदूषणाचा फटका सर्वांनाच चकीत करणारा ठरला आहे. या रासायनिक प्रदूषणामुळे येथील भटक्या कुत्र्यांचा रंग निळा होत आहे.

जर्सिस्क शहरात ऑर्गेस्टेकलो कंपनीच्या परिसरात राहणारे लोक म्हणाले, ६ वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे हा कारखाना बंद पडला होता. या कंपनीत हायड्रोसेनिक अॅसिड व मिथाइल मेथाक्रायलेटचे (प्लेक्सीग्लास) मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. कुत्र्यांचे रंग बदलण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता अधिकारी तपासासाठी येत आहेत. अधिकाऱ्यांनी कुत्र्यांसह प्रकल्पातील नमुनेही घेतले आहेत.

भटक्या जनावरांचा तपास करा, तज्ञांचा सल्ला

जर्सिस्क शहरातील भटक्या जनावरांचा तपास केला पाहिजे. त्यांच्या केसांचा रंग निळा का झालाय? हे शोधण्याची गरज आहे. कदाचित या जनावरांना कॉपरसल्फेट रंगाने रंगवलेले असू शकते, असेही म्हटले जाते. कदाचित अशा रंगाचा त्रास झाल्याने तसेच खाजेतून जनावरांना सूज आली असावी.

बातम्या आणखी आहेत...