आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महिलांसाठी सौदीचे कायदे अत्यंत कडक मानले जात होते, परंतु तेथील परिस्थितीत आता वेगाने परिवर्तन होताना दिसते. अलीकडेच सरकारने कुटुंबीयांच्या परवानगीविना महिलांना स्वत:च्या नावात बदल करण्याचा अधिकार दिला आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. सौदीच्या गृहमंत्रालयाने रविवारी याबद्दलची माहिती दिली.
नव्या कायद्यानुसार सौदीत कोणतीही महिला आपल्या नावात बदल करू शकते. पूर्वी केवळ पुरुषांनाच हा अधिकार होता. आता दोघांनाही हा हक्क मिळाला आहे.
सौदीने देशातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी अलीकडे अनेक प्रकारचे बदल केले. २०१८ मध्ये पहिल्यांदा देशातील महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आली. सोबतच पहिल्यांदा पुरुष जोडीदाराविना एकटे फिरण्याची परवानगी दिली गेली. सौदीच्या महिला आता स्वत: पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. आधी त्यावर बंदी होती. सौदी क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान व्हिजन २०३० यावर काम करत आहेत. त्याअंतर्गत सौदी तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑइल इकॉनॉमी ही आेळख कमी करण्यासाठी सौदीने जगभरातील पर्यटकांसाठी दारे खुली करण्याचेही ठरवले आहे. त्यासाठी महिलांवर निर्बंध घालणारा देश अशी प्रतिमा पुसण्याचाही सौदीचा प्रयत्न दिसतो. त्यातून पुढील वाटचाल सुकर होईल.
सौदी अरेबियाच्या वर्कफोर्समध्ये महिलांच्या जबाबदारीत वाढ
गेल्या काही वर्षांपासून केलेले प्रयत्न आता दिसून येत आहेत. २०१५ मध्ये सौदीच्या स्थानिक निवासींच्या वर्कफोर्समध्ये महिलांची भागीदारी १३ टक्के होती. २०१९ मध्ये त्यात वाढ झाली असून ती ३४.४ टक्क्यांवर गेली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.