आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशेच्या हिंदोळ्यावर प्रवास:सुखी जीवनाच्या शोधात हाेंडुरासहून 3 हजार लाेक अमेरिकेच्या दिशेने पायी रवाना

तेगुसिगल्पा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार महिन्यांत 10 वादळे धडकली, घरे उद्ध्वस्त, शेती करणेही कठीण

सुमारे ९९ लाख लोकसंख्येच्या मध्य अमेरिकेतील हाेडुरास देशात गरीबी, बेरोजगारी, हिंसाचार आणि ड्रग माफियांचे वर्चस्व वाढले आहे. म्हणूनच या समस्यांपासून सुटका व्हावी या आशेने ३ हजार लाेकांचा आणखी एक गट ग्वाटेमाला व मेक्सिकाे मार्गे अमेरिकेच्या दिशेने रवाना झाला आहे. सुखाचे जीवन जगण्यासाठी तसेच राेजगाराच्या शाेधात ते निघाले आहेत. त्यांच्यासमवेत मुले-वृद्धही आहेत. हा लोंढा मेक्सिको व अल सेल्वेडोरसह चार देशांना पार करून अमेरिकेला पाेहोचेल.

२६०० किमींचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना चार महिने लागू शकतात. होंडुरामध्ये गेल्या चार महिन्यांत १० हून जास्त चक्रिवादळांनी तडाखा दिला आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. चक्रिवादळामुळे येथील लोक शेतीही करू शकत नाहीत. म्हणून हे लोक गेल्या तीन वर्षांपासून स्थलांतर करू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...