आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:काेराेनावर इलाज शोधताना कॅन्सरवरील तोडगा मिळाला, संशोधक म्हणाले- दोन वर्षांत कॅन्सरवरील लसही देऊ, किमोपासूनही मुक्ती

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना विषाणूवर उपचार शोधताना जर्मनीच्या वैज्ञानिक दांपत्याला कर्करोगावरील उपाय मिळाला आहे. बायोएनटेकचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओजलेम तुरेसी यांनी शरीराच्या प्रतिकार यंत्रणेला ट्युमरशी मुकाबला करण्यासाठी सक्षम बनवण्याची पद्धत शोधली आहे. आता ते त्याची लस बनवण्यात व्यग्र आहेत. या दांपत्याच्या मते, सर्वकाही ठीक राहिले तर आगामी दोन वर्षांत ते कर्करोगाची लसही उपलब्ध करून देतील. हे दांपत्य २० वर्षांपासून कर्करोगाच्या उपचारासाठी संशोधन करत आहे.

डाॅ. तुरेसी यांनी सांगितले की, बायोएनटेकची कोविड-१९ लस मॅसेंजर-आरएनएच्या (एम-आरएनए) मदतीने मानवी शरीरातील प्रतिरोधक यंत्रणेला विषाणूवर वार करण्यास सक्षम बनवणाऱ्या प्रोटीनच्या उत्पादनाचा संदेश देते. जेएम-आरएनए जेनेटिक कोडचा लहान भाग असतो, तो पेशीत प्रोटीन तयार करतो. त्याचा उपयोग प्रतिरोधक क्षमतेला सुरक्षित अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी होतो आणि त्यासाठी त्याला प्रत्यक्ष विषाणूचीही गरज नसते. आम्ही कोरोना लस तयार करताना याच आधारावर कर्करोगाला पूर्णपणे संपवण्यासाठी काही लसी तयार केल्या आहेत. आता आम्ही लवकरच त्यांची वैद्यकीय चाचणी करणार आहोत. आतापर्यंतचे संशोधन हेच सिद्ध करते की, एम-आरएनए आधारित लसी कर्करोग होण्याआधीच शरीराला त्याच्याशी लढण्याची ताकद देतील. म्हणजे आता कर्करोगाच्या रुग्णांना किमोथेरपी आणि रेडिओथेरपीपासून होणाऱ्या असह्य वेदनांपासून मुक्ती मिळेल. त्याचबरोबर केस गळणे, भूक न लागणे, वजन घटणे यांसारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळेल.

ऑक्सफोर्डचे वैज्ञानिकही एम-आरएनएच्या प्रयोगात व्यग्र
तिकडे, कोरोना लस बनवण्यात सहभागी ऑक्सफर्डच्या वैज्ञानिक प्रा. सारा गिलबर्ट आणि प्रा. एड्रियान हिलही कर्करोगाच्या इलाजात एम-आरएनए तंत्राचा वापर करत आहेत. त्यांनी उन्हाळ्यात फुप्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांवर एम-आरएनए आधारित लसीच्या चाचणीची तयारीही पूर्ण केली आहे. त्यांनी ‘व्हॅक्सीटेक’ नावाची कंपनी स्थापन केली आहे, ती प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारात उपयुक्त ठरणाऱ्या लसीवर आधीपासूनच काम करत आहे. सुरुवातीच्या चाचण्यांत या लसीचे खूपच सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...