आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात सामान्यपणे थंडी पडल्यानंतर महिनाभरासाठी शाळा बंद ठेवली जाते, परंतु रशियाच्या आेएमयाकाेन नावाच्या शहरात उणे ५१ अंश तापमानातही शाळा सुरू असते. हाडे गाेठवणाऱ्या थंडीतही लहान लहान मुले शिक्षणाच्या आेढीने येतात. मात्र तापमान उणे ५२ हाेते तेव्हा ११ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना शाळेत येण्यास मनाई केली जाते. ही सरकारी शाळा असून ती ८३ वर्षे जुनी आहे. ही शाळा सैबेरियात आहे. ही शाळा १९३२ मध्ये स्टॅलिन यांच्या राजवटीत स्थापन झाली हाेती. येथे तुमूल व बेरेग युर्डे गावातील मुले अध्ययनासाठी येतात.
आेएमयाकाेन शहराची लाेकसंख्या सुमारे २५०० आहे. येथे पाेस्ट कार्यालय, बँकेसारख्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या दुर्गम व आव्हानात्मक ठिकाणीदेखील काेराेना विषाणूचा धाेका आहे. जागतिक महामारीतही शाळा सुरू आहे. संसर्गापासून बचावासाठी शाळेत येणाऱ्या मुलांसाेबत पालक व कर्मचारीदेखील शाळेत प्रवेश करण्यापूर्वी तापमान तपासून घेतात. काेणत्याही विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यास त्याची तत्काळ काेविड तपासणी केली जाते. स्थानिक फाेटाेग्राफर सेम्याेन म्हणाले, ८ डिसेंबरला येथे फाेटाेशूट करत हाेताे तेव्हा तापमान ५० अंशांवर हाेते. कामादरम्यान हातमाेजे घातले हाेते. हातमाेजे घातले नसते तर बाेटे गाेठून गेली असती. यावरून लहान मुले येथे थंडीचा मुकाबला करून शाळेत कसे जात असतील याची कल्पना करता येईल.
ही मुले कधी कधी पालकांसाेबत, तर कधी आपल्या पाळीवर श्वानासाेबत असतात. उणे ५० अंश सेल्सियस तापमानावर हायपाेथर्मिया हाेण्याचा धाेका असताे. हायपाेथर्मिया ही एक मेडिकल इमर्जन्सी मानली जाते. यात शरीराचे तापमान झपाट्याने खाली येते. परिणामी रक्तदाब, हृदयाचे ठाेके वाढले, घबराट आणि काही प्रकरणांत मृत्यूदेखील हाेऊ शकताे. अशा तापमानात डाॅक्टर दीर्घ श्वास घेण्यास मनाई करतात. कारण या तापमानात केवळ श्वास घेणेदेखील त्रासदायक ठरू शकते. अतिशय थंड हवा फुप्फुसात भरली जाण्याचा धाेका असताे. ही बाब प्रकृतीसाठी अतिशय धाेकादायक ठरू शकते. या क्षेत्रात केवळ शिक्षणच नव्हे, तर सामान्य जनजीवनदेखील अतिशय आव्हानात्मक आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.