आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेलंबाे:श्रीलंकेमध्ये सरकारी कर्मचारी करणार शेती, एक दिवसाची सुटी

काेलंबाे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेत वाढत्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने नवीन घाेषणा केली आहे. अन्नधान्य उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस शेतीसाठी सुटी जाहीर केली. त्यासाठी शुक्रवारी सुटी दिली जाणार आहे. या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चार दिवस काम करावे लागेल आणि उर्वरित तीन दिवस ते शेती करू शकतील.

सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवारी सुटी हाेती. परंतु श्रीलंका सरकारच्या कॅबिनेटने एक दिवस शुक्रवारी सुटीस मंजुरी दिली हाेती. मंत्रिमंडळाने परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पाच वर्षांचा नाे-पे-लिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशात जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना परत आल्यानंतर सेवानिवृत्तीचा लाभ मिळेल. श्रीलंकेत आतापर्यंतचे गंभीर आर्थिक संकट आेढवले आहे. त्यात अन्नधान्य, इंधन, औषधींचा व्यापक तुटवडा जाणवू लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...