आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेडेड हँडगन बाळगणारे दुपटीवर:कडक नियम नसलेल्या राज्यांत एक तृतीयांश सोबत बाळगतात

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत सार्वजनिक गाेळीबाराच्या घटनांत वाढ हाेत असतानाच हँडगन बाळगणाऱ्या वयस्करांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०१५ च्या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण दुप्पट झाले आहे. वाॅशिंग्टन विद्यापीठातील अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. २०१९ मध्ये नॅशनल फायरआर्म्स पाहणीत हे वास्तव समाेर आले आहे. १.६ काेटी वयस्कर लाेडेड हँडगन जवळ बाळगतात. त्यापैकी ६० लाख लाेक राेज हँडगन साेबत घेऊन फिरत हाेते. २०१५ मध्ये लाेडेड हँडगनसह फिरणारे ९० लाख लाेक हाेते.

हँडगनच्या बाबतीत कडक नियम नसलेल्या राज्यांत असे लाेक हँडगन सहजपणे बाळगतात. कमी नियम असलेल्या राज्यांत एक तृतीयांश हँडगन मालक हँडगन साेबत बाळगतात. कडक नियम असलेल्या राज्यांत केवळ २० टक्के बंदूक बाळगत हाेते. अभ्यास प्रकल्पाचे प्रमुख डाॅ. अली राेहानी रहबर व प्राे. बार्टले डाेब म्हणाले, हँडगन बाळगणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.गेल्या दाेन दशकांपासून राज्यांनी हँडगन बाळगण्याच्या कायद्यात काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. २० हून जास्त राज्यांत हँडगन बाळगण्यासाठी परवान्याची गरज नाही. १९९० मध्ये केवळ एका राज्यात हँडगन बाळगण्यासाठी परवान्याची गरज नव्हती. उर्वरित राज्यांत परवाना अनिवार्य हाेता. अमेरिकेत बंदुकांवरील नियंत्रणासाठी चालवल्या जाणाऱ्या अभियानाला जूनमध्ये हादरा बसला. कारण या महिन्यात सर्वाेच्च न्यायालयाने तसा निर्णय दिला हाेता.

हँडगन सोबत ठेवणाऱ्यांमध्ये चार पुरषांपैकी तीन श्वेत इतर व्यक्तींच्या हल्ल्यापासून सुरक्षेसाठी हँडगन साेबत न१० हँडगन मालकांपैकी सात जण म्हणाले, इतरांपासून सुरक्षेसacाठी साेबत बंदूक बाळगताे. प्रत्येकी पाचपैकी चार असे पुरुष होते. चारपैकी तीन श्वेत समुदायातील होते. बहुतांश वयोगट १८ ते ४४ दरम्यान होता.

बातम्या आणखी आहेत...