आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ In Terms Of Economic Development, Sunak Should Open Doors For Indians!

ब्रिटनच्या भारतवंशीयांची नूतन पंतप्रधानांकडून अपेक्षा:​​​​​​​सुनक यांनी आर्थिक घडी बसवावी, भारतीयांंसाठी दारे खुली करावीत!

लंडन / अॅना सोफिया सोलिस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन व भारतीयांसाठी एेतिहासिक संधी आहे. प्रथमच भारतवंशीय व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाली आहे. म्हणूनच सुनक यांच्यासमाेर आशा व आव्हानांची भलीमाेठी यादीच आहे. ब्रिटनची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवणे हेच सुनक यांच्यासमाेरील सर्वात माेठे आव्हान असेल, असे भारतवंशीय समुदायाचे मत आहे. ब्रिटनमधील सामान्य नागरिक महागाईने त्रस्त झाला आहे. सुनक यांनी लिझ ट्रस यांच्याविरुद्धच्या लढाईत मांडलेली याेजना आता लागू केली पाहिजे, असे मतही भारतवंशीय समुदायाने व्यक्त केले. त्याचबराेबर भारत-ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) देखील लवकरच लागू केला पाहिजे.ब्रिटनचे शहर ब्रिस्टल येथील रेस्तराँ मालक सिद्धार्थ शर्मा सुनक यांच्या स्थलांतरितांच्या धाेरणाचे समर्थन करत नाहीत. ब्रिटनमध्ये येणारे लाेक इमिग्रेशन पाॅलिसीमुळे आज चांगल्या स्थितीत आहेत. भारतीयांना ब्रिटनमध्ये येण्याचा मार्ग सुकर केला पाहिजे. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या बहुतांश भारतवंशीय कुटुंबांच्या तुलनेत सुनक यांची आर्थिक पार्श्वभूमी खूप चांगली आहे. ते प्राडाचे बूट घालतात आणि फ्री मार्केटचे समर्थन करतात. नवी दिल्लीहून ब्रिटनला गेलेले एक आयटी एक्स्पर्ट म्हणाले, सामान्य नागरिकांनी मतदान केले असते तर सुनक पंतप्रधान झाले असते की नाही याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. एका रेडिओ टाॅक शाेमध्ये एक श्राेता विचारताे, ब्रिटनमध्ये बहुतांश श्वेत समुदाय आहे. मग सुनक पंतप्रधान कसे हाेऊ शकतात? सुनक प्राॅपर्टी मार्केट व अर्थव्यवस्थेला चालना देतील, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात. ते म्हणाले, सुनक यांच्या मार्गात अनेक आव्हाने आहेत. त्यांना खासदारांचा पाठिंबा मिळाला नाही तर ते काेणत्याही धाेरणावर काम करू शकणार नाहीत. पश्चिम लंडनमधील भारतवंशीय ब्रिटिश महिला म्हणाल्या, सुनक पंतप्रधान झाल्याने मला विशेष फरक वाटला नाही. सुनक यांनी सर्व ब्रिटिश नागरिकांना समान वागणूक द्यावी. त्यांच्यासाठी चांगले काम करावे. अन्यथा सुनक यांनी थाेडी चूक केली तरी ब्रिटनमधील वास्तव्याला असलेल्या भारतवंशीयांना लक्ष्य केले जाऊ शकते. सुनक पंतप्रधान झाल्याचा आनंद झाला नाही. सुनक काहीतरी चूक करतील या प्रतीक्षेत श्वेत समुदायाचे ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांच्या चुकीनंतर भारतवंशीय समुदायाला लक्ष्य करणे त्यांच्यासाठी अगदी साेपे ठरणार आहे. तसे तर सुनक पंतप्रधान हाेणे ही बाब ब्रिटनमधील भारताचा वाढता दबदबा दर्शवणारी असल्याचे भारतवंशीयांना वाटते.परंतु स्थलांतरित हाेऊन ब्रिटनमध्ये आलेल्या सधन भारतवंशीय गटाचे सुनक प्रतिनिधी आहेत. त्यामुळे स्थलांतरितांचा संघर्ष त्यांनी अनुभवलेला नाही, असे भारतवंशीयांच्या एका गटाला वाटते.

माजी पंतप्रधान बोरिस जाॅन्सन, लिज ट्रस यांच्या डावपेचांचेही आव्हान सुनक यांनी माजी पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांच्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री म्हणून काम केले हाेते. जाॅन्सन यांच्या विराेधातील राजीनाम्याने झालेल्या बंडखाेरीत सुनक आघाडीवर हाेते. तेव्हा जाॅन्सन गटाने सुनक यांना गद्दार संबाेधले हाेते. त्यानंतर काही काळ लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपद सांभाळले. ट्रस यांना अभिजन वर्गाची पार्श्वभूमी असल्याचा मुद्दा सुनक यांनी मांडला हाेता. वास्तविक आता सुनक यांनाही तशी पार्श्वभूमी असूनही ते पंतप्रधान झाले आहेत. अलीकडेच इजिप्तमध्ये आयाेजित काेप-२७ बैठकीला जाण्यास सुनक यांनी नकार दिला हाेता. तेव्हा जाॅन्सन यांनी तत्काळ प्रतिनिधी म्हणून जाण्याची तयारी दर्शवली हाेती.

बातम्या आणखी आहेत...