आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस:पाद्रींच्या अत्याचाराचा उद्या पर्दाफाश, फ्रान्समध्ये 2018 आयोगाकडे हॉटलाइनद्वारे अनेक तक्रारी

पॅरिस22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाच्या शाळा परिसरात २१५ मुलांचे दफन करण्यात आल्याचे प्रकरण शांत हाेत नाही ताेच आता फ्रान्सच्या कॅथाेलिक चर्चमधील लैंगिक शाेषणाच्या घटना उजेडात आल्या. १९५० पासून फ्रेंच कॅथाेलिक चर्चमध्ये हजाराे पीडाेफाइल सक्रिय हाेते. लहान मुलांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आणि त्यांचे शाेषण करणाऱ्यांना पीडाेफाइल म्हटले जाते. या संबंधी स्थापन स्वतंत्र आयाेगाचे प्रमुख जीन-मार्क साॅवे यांनी एक अहवाल जाहीर करण्याच्या आधी माध्यमांना याबद्दलची माहिती दिली.

साॅवे म्हणाले, आयाेगाने तपास केला. त्यात २९०० व आणखी ३२०० पीडाेफाइल, चर्चचे इतर सदस्यही सक्रिय हाेते. पीडाेफाइलची ही आकडेवारी किमान पातळीवर असावी असा अंदाज आहे. वास्तविक ही संख्या जास्त असू शकते. म्हणजे शाेषण करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

फ्रेंच कॅथाेलिक चर्चद्वारे २०१८ मध्ये स्वतंत्र आयाेगाची स्थापना करण्यात आली. पाेप फ्रान्सिस यांनी कॅथाेलिक चर्चमधील लैंगिक शाेषणाच्या घटनांत वाढ झाली हाेती. ही राेखण्यासाठी त्यांनी एेतिहासिक उपाययाेजना जाहीर केली. त्यानुसार लैंगिक शाेषणाच्या घटनेबद्दल माहिती असलेल्या चर्च कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले हाेते. अशा प्रकारची आणखी माहिती समाेर आली आहे. आयाेगात २२ कायदेतज्ज्ञ, डाॅक्टर, इतिहासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, धर्म पंडितांचा समावेश करण्यात आला. १९५० पासून पाद्रींनी केलेल्या लैंगिक शाेषणाचा तपास करणे असे या आयाेगाचे काम हाेते. सुरुवातीला आयाेगाने अनेक साक्षी घेतल्या. साेबतच दूरध्वनी हाॅटलाइन देखील उपलब्ध करून दिली. हाॅटलाइन तयार हाेताच महिनाभरात हजाराे लाेकांनी आपले संदेश पाठवले. त्यात त्यांनी गुदरलेल्या प्रसंगांची माहिती दिली.

बाल लैंगिक शाेषणाविरुद्ध तपास
आयाेगाचा अहवाल मंगळवारी जाहीर हाेणार आहे. न्यायालय तसेच पाेलिस संग्रहालयासह साक्षीदारांच्या मुलाखतीच्या आधारे अडीच वर्षांच्या तपासानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल २५०० पानांचा आहे. त्यात गुन्हेगारांची संख्या, पीडितांची संख्या दाेन्हीबद्दलची माहिती आहे. त्यात चर्चमधील आराेपी कशा प्रकारे सक्रिय असतात. त्यासाठी काेणी चर्चच्या यंत्रणेचा कशा प्रकारे वापर केला, याची सविस्तर माहिती आहे. अहवालात ४५ प्रस्तावही दिले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...