आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Terrorist Attack In Israel In The City Of Ilad, 3 People Were Stabbed To Death, The Terrorist Organization Hamas Praised The Attack

इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला:इलाद शहरात 3 जणांची चाकूने भोसकून हत्या, दहशतवादी संघटना हमासने केले हल्ल्याचे कौतूक

इलाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायलमध्ये गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी इलाद शहरात तीन जणांची चाकूने हत्या करण्यात आली. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल एका दहशतवाद्याला गोळ्या घालण्यात आल्या. तसेच स्थानिक प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

पीडितांना चाकूने वार केले की गोळी मारण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. हल्ल्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे नजर ठेवली जात आहे. मात्र, डॉक्टरांच्या अहवालात धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे. तसेच हेलिकॉप्टरने नजर ठेवली जात आहे.
पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे. तसेच हेलिकॉप्टरने नजर ठेवली जात आहे.

दहशदवादी संघटनेने केले हल्ल्याचे कौतूक
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने या हल्ल्याचे कौतूक केले आहे. मात्र, त्यांनी याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. अल-अक्सा मशिदीवरील हल्लेखोरांना सोडता येणार नाही, असे हमासच्या प्रवक्त्याने सांगितले. अल-अक्सा मशिदीमध्ये नमाज पढत असताना इस्रायली पोलिस आणि पॅलेस्टिनी यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.

इस्रायलमध्ये गेल्या दोन महिन्यांत 5 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत.
इस्रायलमध्ये गेल्या दोन महिन्यांत 5 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत.

मुस्लिम आणि ज्यू यांच्यात झाली हाणामारी
इस्रायलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर शो पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यादरम्यान अनेक भागात मुस्लीम आणि ज्यू यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाल्याने यात काही लोक जखमी झाले.

इस्रायलमध्ये गेल्या 2 महिन्यांत झाले आहेत 5 दहशदवादी हल्ले
गेल्या दोन महिन्यांत इस्रायलवर 5 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांनी तेल अवीववर हल्ला केला होता. येथील जेंगूफ स्ट्रीटवरील गर्दीच्या रेस्टॉरंटमध्ये एका बंदुकीने गोळीबार केला. या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते

बातम्या आणखी आहेत...