आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपात लॉकडाऊनला विरोध:जर्मनीच्या लिपजिग शहरात 25 हजार लोकांनी केले लॉकडाऊनविरोधी निदर्शने

पॅरिस|बर्लिन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18.20 रुग्णांसह रशिया युरोपात पहिल्या आणि फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर

युराेपात आतापर्यंत काेराेनाचे १.३० काेटी रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन व स्पेनसह अनेक देशांत दरराेज विक्रमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे काही देशांत लाॅकडाऊन व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु काेराेनामुळे बिघडलेल्या परिस्थितीत निर्बंध लागू केले जाऊ नयेत, असे लाेकांना वाटू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून जर्मनी, ब्रिटन, फ्रान्समध्ये लाॅकडाऊनच्या विराेधात निदर्शने सुरू आहेत. जर्मनीच्या लिपलिग शहरात मंगळवारी २५ हजारांहून जास्त लाेक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी लाॅकडाऊनला विराेध केला. काेराेना काळात आधीच आर्थिक परिस्थिती काेलमडली आहे. त्यात लाॅकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. युराेपात सर्वाधिक १८.२० लाख रुग्ण रशियात आहेत. फ्रान्समध्ये १८.१० लाख रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...