आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला वनडे सामना आज(शुक्रवार) होत आहे. यादरम्यान ग्राउंडवर एक विचित्र घटना घडली. दोन आंदोलक सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये घुसले आणि यातील एकाने पोस्टर दाखवून अदाणी ग्रुपचा विरोध केला. या पोस्टरवर लिहीले होते, 'नो 1 बिलियन डॉलर अडाणी लोन.' काही दिवसांपूर्वी SBI कडून अदाणी ग्रुपला ऑस्ट्रेलियामध्ये कोल मायनिंगसाठी 5 हजार कोटी रुपये कर्ज दिल्याचे वृत्त समोर आले होते.
SBI कडून कर्जाचे वृत्त
17 नोव्हेंबरला मीडियात आलेल्या बातम्यांनुसार, SBI अदाणी ग्रुपला ऑस्ट्रेलियातील कोल माइनिंग प्रोजेक्टसाठी 1 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे 5,450 कोटी रुपये) देईल. ही रक्कम अदाणी इंटरप्राइजेजची ऑस्ट्रेलियन मायनिंग कंपनी ब्रेवस मायनिंग अँड रिसोर्सेजला दिली जाईल.
रिपोर्ट्सनुसार, SBI आणि अदाणी ग्रुपमध्ये कर्जाची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. यावर बँक अधिकाऱ्यांची कमेटी लवकरच मंजूरी देऊ शकते. यापूर्वी सिटी बँक, डॉयशे बँक, रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड, HSBC आणि बार्कलेजने अदाणी ग्रुपला कर्ज दिल्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच पोस्टर घेऊन आले
ही घटना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना 7 व्या ओव्हरदरम्यान झाली. ही ओव्हर नवदीप सैनी करत होता. तो व्यक्ती ग्राउंडवर आला आणि पिचच्या जवळ येऊन हातात पोस्टर दाखवले. परंतू, सिक्योरिटी गार्ड्सने दोन्ही आंदोलकांना मैदानाच्या बाहेर काढले. कोरोनामुळे 50% प्रेक्षकांना लाइव्ह सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियात ‘स्टॉप अदाणी’ मूव्हमेंट
सध्या ‘स्टॉप अडाणी’ मूव्हमेंट ऑस्ट्रेलिया खूप चर्चेत आहे. लोक अदाणी ग्रुपला क्लायमेट चेंजसाठी दोषी ठरवत आहेत. तर, ग्रुपने ऑस्ट्रेलियात अंदाजे एका दशकानंतर 2019 मध्ये 16 बिलियन डॉलरच्या कोल प्रोजेक्टला मिळवले आहे. यातून वार्षिक 6 कोटी टन कोळसा उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.