आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची दादागिरी चालणार नाही:हिंदी महासागर, हाँगकाँग, मानवी हक्काच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनला सुनावले

वॉशिंग्टन-नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायडेन यांचे आधी भारताला प्राधान्य, नंतर चीनचा क्रमांक - कंवल सिब्बल, माजी परराष्ट्र सचिव

अमेरिकेचे अध्यक्ष झाल्याच्या २२ दिवसांनंतर बायडेन यांनी पहिल्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उभय नेत्यांमधील चर्चा कशी राहिली याचा अंदाज बायडेन यांनी चीनच्या वाढत्या आक्रमकतेचा समाचार घेतला यावरून लावता येऊ शकतो. हाँगकाँगमध्ये चीनने अडेलतट्टूपणा दाखवल्यावरून बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर तेथील परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी थेट शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांचा छळ होत असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. यादरम्यान दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याबाबतही चर्चा केली. संभाषणाच्या सुरुवातीला बायडेन यांनी सोशल मीडियासंबंधी प्रकरणांचा उल्लेख केला. व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, बायडेन यांनी जिनपिंग यांना मानवी हक्काच्या मुद््द्यावर कडक शब्दांत सुनावले. हा प्रश्न अमेरिकाच नव्हे, जगासाठी चिंतेचा आहे. आमची त्यावर कडक भूमिका राहील. अमेरिकेच्या नागरिकांची सुरक्षा व त्यांच्या हितरक्षणाच्या बाबत तडजोड केली जाणार नाही. हिंदी महासागरातील देशांच्या हितांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

पेंटागॉनचा टास्क फोर्स, चीनला उत्तर मिळणार

चीनची कारस्थाने व कुरापतींना ठोस उत्तर देण्यासाठी अमेरिकेने तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत संरक्षण विभाग पेंटागॉनच्या तज्ञांची एक टीम तयार करण्यात आली आहे. चीनचा निपटारा करण्यासाठी ही टीम व्यूहरचना तयार करेल. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेदेखील धमकावणे, दबाव टाकणे इत्यादी कुरापतींना त्याच भाषेत उत्तर देऊ, असे स्पष्ट केले आहे. कोरोनानंतर बायडेन यांची दुसरी टास्क फोर्स आहे.

बायडेन यांचे आधी भारताला प्राधान्य, नंतर चीनचा क्रमांक - कंवल सिब्बल, माजी परराष्ट्र सचिव

पेंगॉगमधून सैनिकांची माघारीचा निर्णय व बायडेन यांची पंतप्रधान माेदी व जिनपिंग यांच्याशी केलेल्या चर्चेला जोडून पाहता येऊ शकत नाही. मुत्सद्यांच्या दृष्टीने भारताला आधी प्राधान्य असेल. चीनचा क्रमांक भारतानंतर असेल, असे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बायडेन यांनी आधी शेजारील देश, नंतर भागीदार देश व त्यानंतर पूर्व आशियातील भागीदारी राष्ट्रांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीदेखील चर्चा केली. त्यादृष्टीने भारताचा क्रमांक शेजारी, भागीदार राष्ट्रानंतर लागतो. अमेरिका व चीन यांच्यात मोकळेपणाने चर्चा झाली. सर्व मतभेदांवर संवाद साधण्यात आला, असे चीनच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. वास्तविक चीन व अमेरिका यांच्यातील वाद ट्रम्प यांच्या कार्यकाळात जास्त ताणल्या गेले. हे संबंध व्यापारयुद्धासारखी स्थिती निर्माण करणारे ठरले होते.

बातम्या आणखी आहेत...