आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In The Name Of Interrogation, The Taliban Intercepted The Planes, Increasing The Wait For Those Stranded

संकट:चौकशीच्या नावाने तालिबानने विमाने रोखली, अडकलेल्या लोकांची निघण्याची प्रतीक्षा वाढली

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात अजूनही अमेरिकेसह इतर देशांचे नागरिक तसेच असे अफगाणी अडकले आहेत, ज्यांना दुसऱ्या देशांचा व्हिसा मिळाला आहे. या नागरिकांची निघण्याची मुदत जाऊन सहा दिवस झाले आहेत, मात्र तालिबानने त्यांचे चौकशीच्या नावाने प्रस्थान रोखले आहे. ज्या देशांचे नागरिक अडकले आहेत त्यांच्या सरकारांसमोर संकट आहे की, त्यांना काढण्यासाठी कोणत्या गटाशी चर्चा करायची. कारण अद्याप तालिबानी सरकारची घोषणा झालेली नाही. मात्र, सरकारे वेगवेगळ्या पातळीवर या लोकांना काढण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. वृत्तानुसार अमेरिका आणि कतारच्या अधिकाऱ्यांसोबत तालिबान लोकांना काढण्यासाठी विमान उतरणे आणि त्यांच्या प्रस्थानास मंजुरी देण्याबाबतची चर्चा मुद्दाम दीर्घकाळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे लोकांची निघण्याची वेळ निश्चित होत नाहीये.

आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, जसजशी वेळ जात आहे, लोकांची सुरक्षाही संकटात येत आहे. उत्तरेतील शहर मजार-ए-शरीफमध्ये विमानतळावरून देश सोडण्याच्या आशेने आलेल्या लोकांची स्थिती वाईट होत आहे. आता मजार-ए-शरीफमध्ये याबाबत संभ्रम आहे की, चार्टर्ड विमाने अमेरिका किंवा इतर पश्चिमेतील देशांसाठी येथून निघतील कशी? कारण तालिबानने आश्वासन दिलेले नाही की, ते मुदतीनंतरही मानवाधिकार लक्षात ठेवून अमेरिकेला मदत करणाऱ्या लोकांना सुरक्षित निघू देतील. यात असे अनेक लोक आहेत जे काबूल विमानतळावर तालिबानी नियंत्रणामुळे उड्डाण करू शकले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...