आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्ज घेऊन मुलींचे लग्न करणे आपल्यासाठी नवे नाही. आता हा ट्रेंड अमेरिकेतही सुरू झाला आहे. इथे ईएमआयवर लग्न होत आहेत. अमेरिकेत महागाई वाढत असल्याने कर्ज घेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा वेळी जोडपी ईएमआयवर लग्न करत आहेत. यासाठी कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्या नवरीच्या ड्रेसपासून नवरदेवाचा सूट आणि बँडबाज्यापासून रिसेप्शनपर्यंतचा सर्व खर्च उचलत आहेत. ही एक प्रकारची वेडिंग क्रेडिट ऑफर असून ती अमेरिकेत अनेक कंपन्या देत आहेत. यात तुम्ही लग्नाचा सर्व पेमेंट नंतर ईएमआयद्वारे करू शकता. ज्याप्रमाणे आफ्टर पे आणि क्लारासारख्या अनेक कंपन्या कपडे व घरगुती सामान खरेदी करण्यासाठी बाय नाउ, पे लेटरची ऑफर देत आहेत त्याच धर्तीवर मारूसारख्या कंपन्या लग्नासाठी ‘बाय नाउ, पे लेटर’ची ऑफर घेऊन आल्या. फोटोग्राफर असो वा व्हिडिअोग्राफर, हेअर वा मेकअप आर्टिस्ट त्यांनी लग्नाच्या व्यवसायाशी संबंधित व्हेंडर्ससोबत करार केले आहेत. लग्नाची तयारी करणारी अँजेला मिल्लिन सांगते, लग्नाचा खर्च सुलभ हप्त्यांत देण्याची सोय असल्याने मी समाधानी आहे. वेडिंग प्लॅनिंग आणि नोंदणी संकेतस्थळाच्या १५ हजार लग्नांवर केलेल्या दुसऱ्या सर्व्हेत हा खर्च सरासरी २२ लाख रुपये सांगण्यात आला. अशा वेळी अमेरिकेत लोकांना भाडे देणे कठीण जात असल्याने त्यांनी किचनच्या गरजा मर्यादित केल्या आहेत.
असे काम करतात अमेरिकेमध्ये वेडिंग क्रेडिट देणाऱ्या कंपन्या लग्नाची तयारी करणारी जोडपी आधी व्हेंडरशी संपर्क साधतात. व्हेंडर हा कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर बिल जमा करतो. त्यानंतर जोडपी हे बिल भरण्यासाठी ३, ६ किंवा १२ महिन्यांच्या ईएमआयची निवड करू शकतात. अर्धे आधी आणि अर्धे नंतर पेमेंटचा पर्यायही निवडू शकतात. कंपनी जोडप्यांची आर्थिक पार्श्वभूमीही तपासतात. जोडपी पेमेंट करू शकत नसतील तर कंपनी व्हेंडरला बिलाची रक्कम कमी करण्यास सांगते. त्यानंतर ज्यांच्या क्रेडिटवर कर्ज देण्यात आले होते अशा जोडप्यांच्या नातेवाइकांकडून पेमेंट वसूल केला जातो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.