आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In The UK, Children Cheat Parents And Pay From Their Accounts For Apps, Games And Movies; The Average Annual Expenditure Of A Child Is Rs. 30,000

दिव्य मराठी विशेष:ब्रिटनमध्ये मुले पालकांना चकवून अॅप, गेम्स, मूव्हींसाठी त्यांच्या खात्यातून परस्पर देताहेत पैसे; एका मुलाचा वर्षभराचा सरासरी खर्च 30 हजार रुपये

लंडन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिक्युरिटी फर्मच्या सर्व्हेत उघड : कार्डचा तपशील ऑनलाइन सेव्ह झाल्याने मुलांना होतेय सुविधा

तुम्ही कधी आपल्या बँक स्टेटमेंटमधील असे व्यवहार पाहून आश्चर्यचकित झाले असाल, ज्याबाबत तुम्हाला माहितीच नव्हती. ब्रिटनमधील पालकही सध्या अशाच रहस्यमय व्यवहारांमुळे त्रस्त आहेत. पांडा या सायबर सिक्युरिटी फर्मच्या अलीकडील सर्व्हेने त्यांची चिंता आणखी वाढवली आहे. ब्रिटनमधील शेकडो मुले अॅपल पे, पेपलसह यूपीआय अॅप आणि डेबिट कार्डचा वापर अॅप, मूव्ही आणि गेम्स खरेदी करण्यासाठी करत असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे. विशेष म्हणजे आई-वडिलांना त्याचा पत्ताच नाही.

पांडा सिक्युरिटीच्या सर्व्हेत ५२% पालकांनी मान्य केले की बँक बॅलन्समध्ये घट झाल्याने आम्ही चकित झालो होतो, हा खर्च मुलांनी केल्याचे नंतर कळले. २१% पालकांनी बँकांशी संपर्क साधला असता, मुलांनीच पैशांचा वापर केल्याचे त्यांना सांगण्यात आले. एक मुलगा हे अनधिकृत गेम्स, अॅप्स आणि चित्रपटांवर वर्षभरात ३२ हजार रुपये खर्च करतो, हे डेटा पाहिल्यानंतर कळते. सर्व्हेत कळले की, मुलांना विशेषत: गेमिंग अॅड-ऑनची सवय लागते. सुरुवातीला मुलांना छोटे-मोठे गिफ्ट देऊन आकर्षित केले जाते, नंतर त्यांना त्याचे व्यसन लागते. १६% पालकांनी सांगितले की, मुलांनी अनेक अॅप डाउनलोड केल्याने आमच्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आढळले होते. सिक्युरिटी एक्स्पर्ट हर्वे लॅम्बर्ट यांनी सांगितले की, आजकाल मुले तंत्रज्ञानाचा सहज वापर करतात, हे पाहणे सुखद आहे. पण आई-वडिलांनी आपली ऑनलाइन खाती सुरक्षित ठेवण्याची गरज आहे.

सिक्युरिटी फर्मने १५०० वर पालकांना प्रश्नांद्वारे त्यांचे अनुभव विचारले होते. आम्ही मुलांना व्यग्र ठेवता यावे यासाठी कार्ड डिटेल्स दिले होते, असे काही पालकांनी मान्य केले. तथापि, भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बहुतांश पालकांनी आता पासवर्ड आणि पिन बदलले आहेत.

अडचण : चुकीचा पासवर्ड टाकल्यामुळे डिव्हाइस झाले लॉक
या सर्व्हेत २४% पालकांनी सांगितले की, डिव्हाइस उघडण्यासाठी अनेकदा चुकीचे पासवर्ड टाकल्याने ते लॉक झाले. ते उघडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. आमच्या कार्डचे डिटेल्स अनेक साइटवर सेव्ह झाले, त्यामुळे मुलांना व्यवहार करणे सोपे झाले, असे ४६% पालकांनी मान्य केले. त्यामुळे कुरिअरने ही डिलिव्हरी घरी आल्यानंतरच १६% पालकांना मुलांनी केलेल्या खर्चाची माहिती मिळाली. आपल्याकडूनच चुकीने व्यवहार झाला असावा, असे २३% पालकांना वाटले होते, तर ऑनलाइन फसवणूक झाली असावी, असा विचार १७% पालकांच्या मनात आला होता.

बातम्या आणखी आहेत...