आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारीशी मुकाबला:अमेरिकेत 12 ते 17 वर्षांपर्यंतच्या 56 टक्के मुलांना पहिला डोस, शाळा सुरू झाल्यानंतर सरकारची जय्यत तयारी

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट घातक परिणाम दाखवू लागला आहे. परंतु शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणे खुली झाल्यानंतर बायडेन सरकारने मुलांसाठी महामारीपासून बचावासाठी सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेंशननुसार (सीडीसी)अमेरिकेत आतापर्यंत १२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे ५६ टक्के मुलांना लसीचा पहिला डोस, तर ४५ टक्के मुलांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. लहान मुलांना डोस द्यावा की नाही याबाबत पालकांमध्ये एक प्रकारची संभ्रम स्थिती आहे. साशंकता आहे. ही साशंकता दूर करण्यासाठी सरकारने जागृती अभियान राबवले आहे. लस निर्मात्या कंपन्याही लसींना पूर्ण सुरक्षित असल्याचे मानत आहेत. लहान मुलांसाठी लस मंजूर करणारा अमेरिका जगातील पहिला देश होता. मे महिन्यात १२ वर्षांवरील गटासाठी लसीकरण कार्यक्रम सुरू झाला.

५ ते ११ वर्षापर्यंतच्या मुलांत इम्युनिटी
फायझरच्या म्हणण्यानुसार ५-११ वर्षांपर्यंतच्या मुलांत कोरोनाविषयी आवश्यक इम्युनिटी लसीमुळे प्रभावी स्वरूपात दिसू लागली आहे. लसीनंतर मुलांमध्ये प्रतिकारशक्ती ६६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. कंपनी मंजुरीसाठी अर्ज करणार आहे.

६ महिने -५ वर्षे गटाचा डेटा जाहीर होणार
सहा महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांवरील लसीचा परिणाम स्पष्ट करणारा डेटा लवकरच जाहीर होणार आहे. फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरिया म्हणाले, परीक्षणात सकारात्मक परिणाम दिसले. म्हणूनच अंतिम परिणामही चांगले येतील.

भारतात पुढल्या महिन्यापासून मुलांचे लसीकरण
युनिसेफच्या आकडेवारीनुसार भारतात मुलांची संख्या सुमारे २५ कोटी आहे. सीरो पाहणीत ६० टक्के मुले संसर्गाविषयी संवेदनशील आढळून आले. आैषध नियामक डीसीजीआयने स्वदेशी कॅडिला कंपनीच्या जायकोव्ह-डी लसीला मंजुरी दिली आहे. ही लस १२ वर्षांहून जास्त वयाच्या मुलांना देता येऊ शकेल. ही लस नीडल फ्री असेल. कंपनी दोन वर्षांहून जास्त वयाच्या मुलांसाठी लसीचेही परीक्षण करत आहे.

विविध देशांत मुलांना लस
ब्रिटन : १२ ते १५ वर्षांपर्यंत मुलांना फायझर लसीच्या किमान एका डोसची शिफारस.
डेन्मार्क : १२ ते १५ वर्षांपर्यंत सरासरी सर्वच मुलांना लसीचा एक डोस दिला.
स्पेन : १२ ते १९ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना लसीचा एक डोस दिलाय.
फ्रान्स : १२ ते १७ वर्षांपर्यंतच्या ६६ टक्के मुलांना एक डोस, ५२ टक्के मुलांना दोन डोस.
जर्मनी : १२ ते १५ वयोगटातील मुलांना जूनमध्ये डोस देण्याची परवानगी मिळाली होती.
स्वीडन : १२ ते १५ वयोगटात फुप्फुसाचा आजार, दम्याने पीडित मुलांना लस.
नॉर्वे : १२ ते १५ वयोगटात मुलांना एक डोसची परवानगी
कॅनडा : १२ वर्षांहून जास्त वयाच्या मुलांना २१ दिवसांच्या अंतराने डोस.
चीन : ३ ते १७ वयोगटातील मुलांना जूनपासून डोस. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची परवानगी.
चिली : ६ वर्षांहून जास्त गटासाठी परवानगी

आई-वडिलांच्या मनात संकोच
कायझरच्या कुटुंब पातळीवरील पाहणीनुसार १२ ते १७ वर्षे या वयोगटात सुमारे २० टक्के पालकांत मुलांना लस देण्याबाबत संकोच दिसून येतो. ५ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या २५ टक्के पालक व ५ पेक्षा कमी वयाच्या मुलांच्या ३० टक्के आई-वडिलांंच्या मनात लसीबद्दल साशंकता आहे. टेक्सासच्या रेने लाबर्ज यांना मुलांमध्ये साइड इफेक्टचा धोका असल्याचे वाटते.

बातम्या आणखी आहेत...