आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत भाड्याने राहणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. घरमालक भाड्यांत सातत्याने वाढ करू लागले आहेत. त्यामुळे भाडेकरूंना अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारच्या समस्यांमुळे वैतागलेल्या भाडेकरूंनी आपली गृहनिर्माणविषयक संस्था स्थापन केली. हाउसिंग डेव्हलपमेंट फंडला काे-ऑपरेटिव्ह करून भाडेकरूंना मदतीचा संकल्प केला. याद्वारे भाड्याने राहणाऱ्यांना स्वस्तात हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. या उपक्रमामुळे अमेरिकेत नवी पद्धत सुरू झाल्याचे दिसून येते.
घरमालकांच्या मनमानी भाडेवाढीला कंटाळलेल्यांच्या मदतीला ही संस्था धावून येते. संस्था स्थापन करणारे भाडेकरू न्यूयॉर्कच्या ब्रोनॉक्स अपार्टमेंटमध्ये पाच वर्षांपासून राहत होते. परंतु एकेदिवशी ते राहत असलेली इमारत एका व्यक्तीला विकण्यात आली. त्यामुळे सर्वच भाडेकरूंसमोर नवी समस्या निर्माण झाली.
कारण नवीन घरमालक त्यांना भाडेवाढ करा, अन्यथा घर सोडा, अशी धमकी देत होता. त्याला कंटाळून काही भाडेकरूंनी एक योजना बनवली. या गटाने एनजीओची मदत घेण्याचे ठरवले. एनजीओने या इमारतीसाठी नवीन मालकांना २० कोटी रुपये देऊन ती खरेदी केली. त्यानंतर भाडेकरूंच्या या गटाला ही इमारत हस्तांतरित करण्यात आली. आता सर्व भाडेकरूंनी केवळ २ लाख रुपये देऊन त्यांनी स्वत:साठी अपार्टमेंट खरेदी केले.
अशा प्रकारे भाडेकरूंची उपेक्षा करणाऱ्या घरमालकांसाठी हा पुढाकार नवा वस्तुपाठ ठरला. भाडेकरूंना बेदखल करण्याची योजना सर्व भाडेकरूंनी मिळून विफल करून टाकली. अशा प्रकारे २०१७ पासून सोबत राहणारे भाडेकरू आता कायमच परस्परांचे शेजारी बनले. आता ते मिळून-मिसळून राहतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.