आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • In The United States, Whites Received 2 Times More Doses Than Blacks; The Death Toll Among Blacks Is About 4 Times Higher

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्णभेद:अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या तुलनेत गोऱ्या समुदायाला मिळाला 2.3 पट जास्त डोस; कृष्णवर्णीयांचे मृत्यू तुलनेने 4 पट जास्त

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना बाधितांची संख्या 10 कोटी पार, अमेरिकेत लसीकरणात तफावत

जगात कोरोना बाधितांची संख्या १० कोटींहून जास्त झाली आहे. सर्वाधिक बाधित अमेरिकेत आहेत. तेथील परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. तेथे २.६ कोटींहून जास्त बाधित असून ४.३५ लाख लोकांना प्राण गमवावे लागले. येथे कोरोनापासून बचावासाठी ४५ दिवसांपासून लसीकरण सुरू आहे.

लसीकरणाच्या बाबतीत कृष्णवर्णीय व गोऱ्या समुदायातील भेदभाव देखील समोर आला आहे. १४ राज्यांचे विश्लेषण केल्यानंतर लॅटिन व कृष्णवर्णीय समुदायाच्या तुलनेत दुप्पट डोस गोऱ्यांना दिल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकी रोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशात ४ टक्के श्वेतवर्णीय लोकसंख्येला लस देण्यात आली आहे. कृष्ण‌वर्णीय (१.९ टक्के) च्या तुलनेत त्यांचे प्रमाण २.३ पट जास्त आहे. रुग्णालयात दाखल कृष्णवर्णीय लोक महामारीचा मुकाबला करत आहेत.

चिंता : ब्रिटनमध्ये मृत्यू १ लाखावर

ब्रिटनमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ लाखावर गेली आहे. येथे आतापर्यंत १००, १६२ लोकांना प्राण गमवावे लागले. ३६.८९ लाख बाधित आहेत. तैवानमध्ये प्रोटोकॉल तोडल्याचे सातवे प्रकरण घडले आहे.

दिलासा : स्थानिक रुग्ण नाही

ऑस्ट्रेलियात कोरोनाशी लढाई करताना चांगली बातमी आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा एकही स्थानिक रुग्ण आढळला नाही. न्यू साऊथ वेल्सने वेगाने वाढणाऱ्या महामारीवर नियंत्रण मिळवले.

बातम्या आणखी आहेत...