आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डाॅक्टर, आराेग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेत एक काेटीपर्यंतच्या व्हॅन

कॅलिफाेर्नियाएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 2500 हून जास्त आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा संसर्गापासून बचाव करण्याचा उद्देश

जगभरात कहर करणाऱ्या काेराेना विषाणूचा अमेरिकेला प्रचंड फटका बसला आहे. येथे ११ लाखांहून जास्त रुग्ण व ६५ हजारांहून जास्त लाेकांना प्राण गमवावे लागले. त्यात डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अशा स्थितीत लाेक काेराेना याेद्ध्यांची शक्य तितकी मदत करू लागले आहेत. कॅलिफाॅर्निया व मिशिगनच्या लाेकांनी अशाच एका उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या लाेकांनी डाॅक्टर, नर्स व आराेग्य कर्मचाऱ्यांना आपली आरव्ही म्हणजेच रिक्रिएशन व्हॅन माेफत दिली आहे. आरव्हीचे मासिक भाडे सुमारे ४ लाखापर्यंत असू शकते. या व्हॅनमुळे बाहेरगावी कर्मचाऱ्यांना घरातल्यासारखी आरामदायी व्यवस्था मिळत आहे.

एका व्यक्तीपासून सुरू झालेल्या या माेहिमेला माेठे रूप आले आहे. माेहिमेत आता १५ हजारांवर आरव्ही मालक सेवाभावातून सहभागी झाले आहेत. ते आपले वाहन माेफत देण्यास तयार आहेत. आतापर्यंत या माेहिमेसाठी २५०० हून जास्त डाॅक्टर, परिचारिका व आराेग्य कर्मचाऱ्यांना व्हॅन देण्यात आली आहे. बहुतांश लाेक आरव्हीचा वापर घरापासून दूर असताना करू लागले आहेत. मिशिगनच्या प्लेनवेल भागातील पेटीज कात्झे व त्यांचे पतीही तेच करत आहेत. ते ब्राॅन्सन मेथाेडिस्ट हाॅस्पिटलमध्ये नर्स व ब्रदर असून आयसीयूमध्ये काम करतात. सध्या ते करेन व स्टीव्ह लँबर्ट यांनी दिलेल्या आरव्हीचा वापर करू लागले आहेत. सध्या हे अद्ययावत वाहन या आराेग्य कर्मचाऱ्यांच्या घराबाहेर उभे असते. करेन व स्टिव्ह सुमारे २०० किमी अंतरावर आले हाेते. स्टिव्ह म्हणाले, आमच्या व्हॅनमध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत. हे खूप माेठे संसाधन आहे. परंतु, त्याचा याेग्य वापर हाेत नसल्याचे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही काेराेना योद्ध्यांसाठी हे वाहन देण्याचा निर्णय घेतला. केटिजला अशा वाहनाची गरज आहे, असे आम्हाला समजले तेव्हा आम्ही टुरिस्ट व्हॅनला येथे आणल्याचे स्टिव्ह यांनी सांगितले. पेटीज अतिशय आनंदी आहेत. त्या म्हणाल्या, आरव्हीमुळे माझ्या खांद्यावरील आेझे उतरले आहे. मला माझ्या ५ ते ६ वर्षांच्या मुलांची व आईची चिंता सतावत हाेती. आईवर अलीकडेच किडनी प्रत्याराेपण शस्रक्रिया झाली. अशा परिस्थितीत त्यांना काेराेनाचा गंभीर धाेका शक्य आहे. आता आम्ही घराजवळच आहाेत. आता कुटुंबाला दूरवरून काही हाेईना पाहू शकताे. पेटीजला व्हॅन दिल्यानंतर स्टिव्ह यांनी त्यांच्या कुटुंबाबराेबर सेल्फीही घेतली. अशाच प्रकारचा गट इतर लाेकही करू लागले आहेत.

या व्हॅनला आरव्ही म्हणजेच रिक्रिएश्नल व्हेईकल संबाेधले जाते. त्यांना प्रवासादरम्यान अस्थायी घर म्हणून वापरले जाऊ शकते. सुमारे ५० लाख ते १ काेटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या व्हॅनमध्ये किचन, टाॅयलेट, टीव्ही, बेडरूम, साेफ्यासारख्या सुविधाही आहेत. छताला उचलून उंच करता येईल, अशी डिझाइन आहे. माेटारहाेम, कॅम्पर असेही त्यास संबाेधले जाते. अमेरिकेत सरासरी ४५ वर्षांच्या व्यक्तीकडे अशी व्हॅन असते.

बातम्या आणखी आहेत...