आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • In The World Rankings 71 Universities In The Country, While IIS Is The Best University In The Country

लंडन:जागतिक रँकिंगमध्ये देशातील सर्वात जास्त 71 विद्यापीठे, आयआयएस देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

लंडन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाइम्स हायर एज्युकेशनने (द) गुरुवारी जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकिंग जारी केले. जागतिक विद्यापीठ रँकिंग-२०२२ मध्ये ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ सलग सहाव्या वर्षी अव्वल क्रमांकावर आहे. यादीत भारतातील ७१ विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस), बंगळुरू भारतातील सर्वोच्च रँकिंगची संस्था ठरली आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेचे रँकिंग ३०१ ते ३५० दरम्यान कायम आहे. या वेळी यादीत ९९ देशांतील १,६६२ विद्यापीठांचा समावेश आहे. गेल्या वर्षी १,५२७ विद्यापीठे होती. यंदा यादीत भारताच्या ७१ संस्थांचा समावेश आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या वर्षी ही संख्या ६३ होती. तथापि, कुठलीही संस्था अव्वल ३०० मध्येही स्थान मिळवू शकली नाही.

७ संस्था रँकिंगमध्ये सहभागी नाहीत : दिल्ली, मुंबई, खरगपूर आणि मद्राससहित सात फर्स्ट जनरेशनच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या यादीबाहेर आहेत. डेटा विसंगती आणि पारदर्शकतेच्या अभावाचा हवाला देत या संस्थांनी गेल्या वर्षी जागतिक रँकिंगमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टाइम्स हायर एज्युकेशनचे प्रमुख नाॅलेज अधिकारी फिल बॅटी यांनी सांगितले की, आम्ही रँकिंगमध्ये सहभागी न होणाऱ्या सर्व आयआयटीशी संपर्क केला आहे.

जगातील टॉप १० विद्यापीठे : १. ऑक्सफर्ड विद्यापीठ, २. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, ३. हार्वर्ड विद्यापीठ, ४. स्टॅनफर्ड विद्यापीठ, ५. केम्ब्रिज विद्यापीठ, ६. एमआयटी, ७. प्रिन्स्टन विद्यापीठ, ८. कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ, ९. येल विद्यापीठ, १०. शिकागो विद्यापीठ.

बातम्या आणखी आहेत...