आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्याही रुग्णालयात रुग्णांची सेवा व शुश्रूषा करण्याची जबाबदारी डॉक्टरांच्या तुलनेत परिचारिकांची जास्त दिसून येते. एखाद्या युद्धात होरपळणाऱ्या देशात ही जबाबदारी आणखीन महत्त्वाची ठरते. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिचारिकांचा सेवाभाव, त्याग सांगणाऱ्या अनेक कथा समोर येत आहेत.
कलाशिक्षक पद सोडले, आता रुग्णसेवेत वाहून घेतले : बिलोहोरोडकामध्ये पतीसमवेत राहणाऱ्या इन्ना विश्नेवस्काया काही वर्षांपासून कलाशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. फेब्रुवारीत सुरू झालेल्या युद्धाने त्यांच्यावर पुन्हा लष्करी वर्दी, हेल्मेट आणि बुलेटप्रूफ परिधान करण्याची वेळ आणली. त्यांनी पॅरामेडिकलचा जुना व्यवसाय पुन्हा स्वीकारला. त्या म्हणाल्या, २०१४ च्या युद्धातही पॅरामेडिकल म्हणून सक्रिय होते. युद्ध संपल्यानंतर छंद पूर्ण करण्यासाठी कला शिक्षिका म्हणून सक्रिय झाले होते. पुन्हा तेच काम करावे लागेल, असा कधीही विचार केला नव्हता. रशियाचे हल्ले सुरू असताना जखमींपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाइल असिस्टंट टीम बनवली. कारने जखमींपर्यंत पोहोचते. चालक सोबत असतो. तो अंगरक्षकही आहे. दउन भागात काम करणे कठीण आहे. या भागातून रशियन सैन्य परतले आहे. रशियाने या भागात सुरुंग पेरले.
ऑस्ट्रेलियातून आलेल्या मायलेकीही सेवेत : ऑस्ट्रेलियाच्या एबोनी हेेवेट लिव्हच्या रुग्णालयात आई ट्रिसिया मिलरसोबत सेवेच्या कार्यात उतरल्या आहेत. एबोनी म्हणाल्या, आम्ही इमर्जन्सी युनिटमध्ये आहोत. त्यामुळे कामाची वेळ निश्चित नसते. काही हल्ला झाल्यानंतर जखमींची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणूनच उपचारासाठी तयार राहावे लागते. युद्धकाळात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. कोविड काळातही इतर देशांत काम केले.
रुग्णालयातून घरी जाताना स्फोटात पाय गमावले, पतीचा आधार
या आहेत लहान मुलांच्या नर्स ओक्साना. रशियन हल्ले सुरू असतानाही त्या लिसिचान्स्कच्या रुग्णालयात ठाण मांडून होत्या. एकेदिवशी घरी परतताना सुरुंग स्फोट झाला. त्यात त्यांना दोन्ही पाय आणि एका हाताची चार बोटे गमवावी लागली. त्या म्हणाल्या, पती व्हिक्टरची खूप साथ आहे. मला दोन मुले आहेत. रुग्णालयात असताना पती व्हिक्टरने पुन्हा विवाह करून मला बळ दिले. पुढील उपचारासाठी जर्मनीला जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.